AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : नाहीतर तुम्ही राजकारण करताय सिद्ध होईल, महाराष्ट्रातल्या भाजपच्या मंत्र्यांचे अभिजीत दीपकेंना ओपन चॅलेंज

महाराष्ट्रातल्या भाजपच्या मंत्र्यांचे अभिजीत दीपके यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्या, असं आव्हान मंत्री उइके यांनी दिलं.

Abhijeet Dipke : नाहीतर तुम्ही राजकारण करताय सिद्ध होईल, महाराष्ट्रातल्या भाजपच्या मंत्र्यांचे अभिजीत दीपकेंना ओपन चॅलेंज
abhijeet Dipke cjpImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 9:40 AM
Share

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी आदिवासी स्कूल चलो अभियान सुरू केलं आहे. या मोहिमेच्या माध्यमातून दीपके आदिवासी आश्रमशाळांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पोलखोल करत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अभिजीत दिपके हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. दीपके हे महाराष्ट्रातील विविध आदिवासी भागात जाऊन पाहणी करत असल्याचे दिसत आहेत. परंतु अभिजीत दीपके हे काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट देत नसल्याचा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्याही आश्रमशाळांना भेट देण्याचे आव्हान मंत्री उइके यांनी केलं.

काँक्रोच जनता पार्टीचे दिपके हे काल नंदूरबारच्या दौऱ्यावर होते. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची चाचणी केली. अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीपके यांनी पाहणी केली. त्यांनी केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्याचा दावा केला. सरकारकडे पैशांची कमतरता नाही, बजेट आहे. मात्र उपलब्ध निधीचा योग्य वापर केला जात नसल्याचा आरोप दीपकेंनी केला आहे. ५० खोके एकदम ओके, पण हेल्थकेअर कधी ओके? आदिवासी शाळा कधी ओके? आमदार ओके झाले, खासदारही ओके झाले, मग ही मुलं कधी ओके होणार? असा दिपके यांनी सरकारला सवाल केला. दिपकेंच्या दौऱ्यामुळे सरकारच्या आदिवासी विकास विभागाची एकच धावपळ उडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता दिपकेंच्या दौऱ्यावरच आता मंत्री उइके यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

सत्ताधाऱ्यांवरील आरोपानंतर मंत्री अशोक उइके यांनी दिपकेंना आदिवासी स्कूल चलो अभियानावरून आव्हान दिलं आहे. बहुतांश आदिवासी आश्रमशाळा या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आहेत. दिपकेंनी काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्यावी. नाहीतर दीपके राजकारण करत असल्याचे सिद्ध होईल. येत्या 3 महिन्यात आश्रमशाळांचे ऑडिट करणार आहे. सोयीसुविधा न देणाऱ्या आश्रमशाळांवर कारवाई करणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्री अशोक उइके यांनी अभिजीत दिपके यांना खुलं आव्हान दिलं आहे. उईके यांच्या चॅलेंजनंतर दिपके आव्हान स्वीकारणार का, हे आता पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी