AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर थेट हे शिक्षणमंत्री अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर, FIR..

अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन पुकारले. त्यांच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील झाला. त्यातच आता अजून एक शिक्षणमंत्री कॉकरोच जनता पार्टीच्या निशाण्यावर आहे.

Abhijit Dipke : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर थेट हे शिक्षणमंत्री अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर, FIR..
Abhijit Dipke
| Updated on: Sep 22, 2026 | 5:37 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने पहिल्याच आंदोलनात मोठा धमाका केला. कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन नीट पेपरफुटीच्या विरोधात पुकारले. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेक शहरातून विद्यार्थी या आंदोलनात पोहोचली. यासोबतच मुंबईसह अन्य शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सुरवातीला सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे टाळले. मात्र, प्रचंड वाढलेल्या दबावानंतर सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिला राजीनामा ठरला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलन थांबले. त्यानंतर पुढे नक्की कॉकरोच जनता पार्टी काय करणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.

यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, ते तात्काळ राजकारणात उतरणार नाहीत, ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढतील. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा जिल्हापरिषद शाळेंकडे वळवला. त्यातच आता धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर अजून एक शिक्षणमंत्री अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर आहेत. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांना आव्हान देण्यात आले की, त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर FIR दाखल करूनच दाखवावे.

त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत त्यांना आव्हान दिले. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, राजस्थान सरकार शिक्षकांना धमकावत आहे. आशुतोष रांका यांनी लिहिले की, आम्ही परवा उदयपुरच्या देमत गावच्या सरकारी शाळांचा दाैरा केला. तेथील परिस्थिती आम्ही देशासमोर ठेवली. त्यात आता कानावर आले की, तेथील शिक्षकांना धमकावले जात आहे. @madandilwar कारण शाळा ठीक होत आहेत.

जर FIR वरच सर्व गोष्टी होत आहेत, तर त्यात माझेही नाव टाका. माझ्यानंतर माझ्या टीमवरही FIR दाखल करा. यादरम्यान त्यांनी पोस्टमध्ये स्थानिक पाच पदाधिकाऱ्यांचे नावही टाकली आहेत. पुढे लिहिले की, आम्हाला अटकही करा. त्यानंतर आम्ही पूर्ण देशात जेल भरो करणार. हा पण हे लक्षात ठेवा की, आम्ही शाळा ठीक करूनच राहणार. हीच पोस्ट रिशेअर करत अभिजीत दिपके यांनी लिहिले की, माझे पण नाव टाका.

Follow Us
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही