AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Movie Review: 4000 कोटींमध्ये बनलेला ‘रामायण’ सिनेमा कसा आहे? पाहायला जाण्याआधी वाचा रिव्ह्यू

Ramayana Part 1 Movie Review: गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील स्टार कास्ट, चित्रपटाचे बजेट या सर्वच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होत्या. आता हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाची रिव्ह्यू कसा आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ramayana Movie Review: 4000 कोटींमध्ये बनलेला ‘रामायण’ सिनेमा कसा आहे? पाहायला जाण्याआधी वाचा रिव्ह्यू
Ramayana Part 1 Movie ReviewImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 8:17 AM
Share

दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणारा ‘रामायण’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर भारतीय सांस्कृतिक वारशाचा एक भव्य चित्रपट स्वरुपातील उत्सव आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आतापर्यंत बनलेल्या सर्व रामायण चित्रपटांमध्ये सर्वात प्रभावी आणि आकर्षक आहे. अप्रतिम व्हिज्युअल सोबतच, त्याची कथा सांगण्याचा भावनिक प्रयत्न आणि प्रामाणिकता प्रेक्षकांना थक्क करत आहे. रणबीर कपूरची प्रभू श्री रामांची भूमिका, यशचा रावणाच्या रूपात जबरदस्त अंदाज आणि साई पल्लवीचा शांत पण दृढनिश्चयी माँ सीतेचा रोल… हा चित्रपट प्रत्येक बाबतीत एक मैलाचा दगड ठरत आहे.  ‘रामायण’ थिएटरमध्ये एक जादूई अनुभव ठरत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘रामायण’ चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची प्रामाणिक आणि भावनिक कथा. नितेश तिवारी यांनी प्रेक्षकांना फक्त एक परिचित पौराणिक कथा दाखवली नाही, तर या महाकाव्याच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची सुरुवात देव आणि राक्षसांमधील ब्रह्मांडामध्ये सतत चालणाऱ्या संघर्षाने होते, जी रावणाच्या (यश) बालपणात, त्याच्या कठोर तपस्येत आणि अजिंक्य होण्याच्या प्रवासात उत्कृष्टरीत्या गुंफली आहे. नंतर कथा अयोध्यकडे वळते, जिथे राजा दशरथ (अरुण गोविल) यांच्या चार मुलांच्या (राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न) जन्म आणि शिक्षणाचे चित्रण खूप काळजीपूर्वक केले आहे. पार्ट वन मुख्यतः रामाचे मानवी आणि दैवी पैलूंमधील संतुलन, विश्वामित्रासोबत आश्रमाची यात्रा, ताडकवधा, अहिल्येला मुक्त करणे आणि मिथिलेतील सीतेच्या स्वयंवराच्या घटनांवर केंद्रित आहे. ही कथा धर्म, त्याग, कर्तव्य आणि भक्ती यासारख्या वैश्विक मूल्यांना आजच्या पिढीसाठी खूप सोप्या आणि भावनिक पद्धतीने मांडते.

कलाकारांचा अभिनय कसा आहे?

रणबीर कपूर (भगवान राम): रणबीर कपूरची कामगिरी या चित्रपटाची खासियत आहे. त्यांनी भगवान रामाची गरिमा, संयम, शांती, दया आणि क्षत्रिय वीरता अत्यंत गांभीर्याने आणि आत्मसंयमाने साकारली आहे. त्याच्या डोळ्यांत एक अनोखी चमक आणि मृदुता दिसते. लढाईच्या दृश्यांदरम्यान त्याची बॉडी लँग्वेज आणि डायलॉग डिलिव्हरीतील ठाम विश्वास या भूमिकेसाठी त्यानs केलेल्या प्रचंड तयारीचे दर्शन घडवते.

यश (रावण): रॉकिंग स्टार यशने रावणाच्या भूमिकेत जबरदस्त ऊर्जा ओतली आहे. त्याचा स्क्रीन प्रेजन्स इतका दमदार आहे की तो प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कणखर आवाजातून यशने रावणाचा अहंकार, बुद्धिमत्ता आणि अजिंक्यता जिवंत केली आहे. तो फक्त एक खलनायक म्हणूनच नव्हे, तर एक अत्यंत मोठा आणि शक्तिशाली माणूस म्हणून उभा राहतो.

साई पल्लवी (माता सीता): साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत खूप आदर, साधेपणा आणि भावनिक टच देताना दिसत आहे. चित्रपटातील तिचा वावर इतका नैसर्गिक आहे की तो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतोय. माता सीतेच्या अंतर्गत शक्ती, दयाळूपणा आणि आपल्या मूल्यांबद्दलची निष्ठा साई पल्लवीने सुंदररीत्या साकारली आहे.

सपोर्टिंग कास्ट: रवी दुबेने लक्ष्मणाच्या भूमिकेत भावावरचे प्रेम आणि दृढ निष्ठा उत्कृष्टरीत्या साकारली आहे. राजा दशरथाच्या भूमिकेत अरुण गोविल यांची उपस्थिती जुन्या आठवणी ताज्या करते आणि कथेला भावनिक ताकद देते. इतर सर्व सपोर्टिंग कलाकारही आपल्या लहान पण महत्त्वाच्या भूमिका न्याय देतात.

काय आहेत कमतरता?

रामायण या चित्रपटाचा कालावधी हा जास्त आहे. तसेच रावणच्या बॅकग्राऊंडमधील आवाज हा नकोसा वाटतो. तसेच रामाचे बालपण दाखवण्यात खूप वेळ घालवला आहे. चित्रपटातील गाणी ही खूप मंद गतीने पुढे जात असल्यासारखे वाटते.

‘रामायण: पार्ट १’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर बॉलिवूडच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. ४००० कोटींच्या बजेटसह नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांनी एक जागतिक दर्जाचे व्हिज्युअल मास्टरपीस तयार केले आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. रणबीर कपूरची गरिमा, यशची प्रतिभा, साई पल्लवीचे समर्पण आणि रहमान-झिमरचे जादूई संगीत या चित्रपटाला अवश्य पाहण्यासारखे बनवतात. हा चित्रपट पूर्णपणे सर्वांच्या अपेक्षापूर्ण करतो.

Follow Us
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष