AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक आयटी कंपनी प्रकरणात कोणताही धार्मिक, जातीय रंग नाही – भाजप आमदार

"काही काळ संजय शिरसाट नगरसेवक होते. त्या काळात त्यांनी भूतं पाहिली असतील. मला मात्र काही माहिती नाही. अचानक त्यांना कोणते भूत भेटले याचा शोध घ्यावा लागेल"

नाशिक आयटी कंपनी प्रकरणात कोणताही धार्मिक, जातीय रंग नाही - भाजप आमदार
Sanjay Kenekar
| Updated on: Apr 17, 2026 | 1:35 PM
Share

“संतांवर आरोप करणे ही विकास लवांडे यांची प्रवृत्ती पूर्वीपासूनच आहे. ही राष्ट्रवादीच्या निधर्मी नेत्यांची पिलावळ आहे. मौलाना-मौलवींच्या दाढ्या कुरवळण्यात यांचे आयुष्य गेलं आहे. त्यांना काय हिंदुत्व माहिती? जे मौलाना-मौलवींच्या पंक्तीत बसून राजकारण करतात, त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा काय अधिकार? विकास लवांडे यांनी आधी स्वतःकडे पाहावे. पन्नास वर्षांत हिंदूंसाठी काय केले? 2014 पासून हिंदू पर्व सुरू झाले आहे. वामपंथीयांच्या नादी लागून यांनी या देशाला निधर्मी करण्याचा प्रयत्न केला होता” अशी टीका भाजप आमदार संजय केनेकर यांनी केली.

“संजय राऊत हे ‘मुंगेरिलाल के हसीन सपने’ पाहत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. ते चित्र रंगवतात आणि नंतर ते चित्र फाटलेले दिसते” असं उद्धव ठाकरे यांची निवडणूक बिनविरोध होईल या संजय राऊतांच्या वक्तव्यावर संजय केनेकर बोलले. नाशिक आयटी कंपनी प्रकरणावर बोलताना संदय केनेकर म्हणाले की, “यात कोणताही धार्मिक किंवा जातीय रंग नाही. ज्या पद्धतीने त्यांनी ‘लव्ह जिहाद’ची भूमिका डोक्यात ठेवून हे प्रकरण केले आहे, त्यामुळे निश्चितच फसवणूक झाली आहे”

औरंगजेब समर्थक कुठल्या ना कुठल्या मार्गाने डोके वर काढतात

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले, तेव्हापासून औरंगजेब समर्थक कुठल्या ना कुठल्या मार्गाने डोके वर काढत आहेत. बाबासाहेबांच्या रॅलीला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला असून, जिहादी घटकांच्या माध्यमातून हे घडले आहे. याची निश्चित चौकशी होईल” असं संजय केनेकर औरंगजेबाचा फोटो नाचवण्यावर म्हणाले.

त्या काळात त्यांनी भूतं पाहिली असतील

“काही काळ संजय शिरसाट नगरसेवक होते. त्या काळात त्यांनी भूतं पाहिली असतील. मला मात्र काही माहिती नाही. अचानक त्यांना कोणते भूत भेटले याचा शोध घ्यावा लागेल. मी सुद्धा पंधरा ते वीस वर्षे नगरसेवक होतो, पण मला कधीच कोणते भूत भेटले नाही” असं संजय केनेकर म्हणाले. संजय शिरसाट यांनी महानगरपालिकेत आत्म्याचा वावर असल्याचं वक्तव्य केलं होतं.

जी.श्रीकांत यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ‘ते सक्षम आणि चांगले अधिकारी असल्यामुळे सरकारने त्यांची विभागीय आयुक्तपदी बदली केली आहे. हा योग्य निर्णय आहे’ असं केनेकर यांनी सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...