AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TCS मध्ये टीम लीडर त्यांच्या डेस्कचा वापर कामासाठी नव्हे तर महिलांना..अजून एक धक्कादायक प्रकार उघड

Nashik IT Company : "दानिश आणि रझा. ते ऑफिसमधूनच वीकेंडसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट बुक करायचे आणि तिथे येण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकायचे. तिथलं वातावरण खूपच विषारी होतं"

Nashik TCS मध्ये टीम लीडर त्यांच्या डेस्कचा वापर कामासाठी नव्हे तर महिलांना..अजून एक धक्कादायक प्रकार उघड
Nashik IT Company
| Updated on: Apr 17, 2026 | 1:01 PM
Share

नाशिक टीसीएस प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. मानसिक, लैंगिक छळ, धर्मांतर असे सगळे प्रकार कंपनीत चालत असल्याचं समोर आलय. महत्वाचं म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही देशातील अग्रग्ण्य आयटी कंपनी आहे. तिथे असे प्रकार चालत असल्याचं समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आता कंपनीतील काही महिला कर्मचारी पुढे येऊन बोलत आहेत. त्यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. नाशिक टीसीएसमध्ये टीम लीडर त्यांच्या डेस्कचा वापर कामासाठी नव्हे तर महिला कर्मचाऱ्यांना मानसिक आणि नैतिक मुल्यांवरुन त्रास देण्यासाठी वापरायचे. टीम लीडर जेव्हा बोलवायचे तेव्हा ते महिलांसोबत अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे असं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

“सर्व आरोपींची खासकरुन त्यांची बोलण्याची पद्धत अत्यंत घाणेरडी होती. मुलींना टीम लीडरच्या डेस्कवर बोलवायचे व तिथे अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे. कुठल्याही व्यावसायिक कार्यालयात अशा पद्धतीने बोललं जात नाही” असं एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलं. एका माजी महिला कर्मचाऱ्याने दोन स्टाफ मेंबरची नाव सांगितली. “दानिश आणि रझा. ते ऑफिसमधूनच वीकेंडसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट बुक करायचे आणि तिथे येण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकायचे. तिथलं वातावरण खूपच विषारी होतं. कंपनी सोडल्यानंतर आता बरं वाटतय” असं तिने सांगितलं.

सिनियर मॅनेजमेंटला याची कल्पना नव्हती का?

एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑर्गनायजेशनमध्ये सिनियर मॅनेजमेंटला याची कल्पना नव्हती का? इथे काय चाललय? असा सवाल तिने उपस्थित केला. एकूण आठ महिला कर्मचाऱ्यांनी याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. तपासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाच एचआर निदा खानचा सुद्धा रोल महत्वाचा आहे. तिच्याकडे तक्रारी करुन देखील तिने दखल घेतली नाही असं कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या ही निदा खान फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिने हे सर्व विषय कसे हाताळले? हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...