AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company : मोठी बातमी, फरार असलेली नाशिक TCS ची HR निदा खान प्रेग्नेंट

Nashik IT Company : एका आरोपीने महिला कर्मचाऱ्याला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले असं पोलिसांनी सांगितलं. आरोपीने एका महिला कर्मचाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तिच्या व्यक्तिगत आणि वैवाहिक आयुष्याबद्दल घाणेरडी टिप्पणी केली.

Nashik IT Company : मोठी बातमी, फरार असलेली नाशिक TCS ची HR निदा खान प्रेग्नेंट
Nida Khan
| Updated on: Apr 17, 2026 | 12:26 PM
Share

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची (टीसीएस) एचआर मॅनेजर निदा खान बद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. टीसीएसच्या नाशिक युनिटमधील अनेक धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे राज्यचं नाही, देश हादरला आहे. टीसीएसमध्ये महिलांचं कसं लैंगिक शोषण केलं जायचं, धर्मांतराची दबाव अशा अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात निदा खान आरोपी आहे. निदा खानचा शोध सुरु आहे. सध्या ती मुंबईत असून लवकरच ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे असं तिच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलय. निदा खानकडे कंपनीतील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांचं लैंगिक शोषण सुरु आहे. धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो. गैरवर्तन केलं जातं. पण निदा खानने एचआर म्हणून या सर्व तक्रारी कशा हाताळल्या? यासाठी पोलिसांना तिची चौकशी करायची आहे.

सध्या फरार असलेल्या निदा खानने अटकपूर्व जामीन अर्जासाठी नाशिकच्या स्थानिक कोर्टात अर्ज केला आहे. तिने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जात वैद्यकीय कंडीशनचा हवाला दिला आहे. त्या आधारावर तिला अटकपूर्व जामीन हवा आहे. निदा खान 25 वर्षांची असून तिने 2021 साली नाशिक टिसीएस जॉईंन केली होती. लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतराच्या टीसीएस नाशिकशी संबंधित नऊ तक्रारींची पोलीस चौकशी करत आहेत. पोलीसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे. महिला एचआर फरार आहे.

वैवाहिक आयुष्याबद्दल घाणेरडी टिप्पणी

आठ महिला कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली आहे. कंपनीतले सिनियर सहकारी मानसिक त्रास देऊन लैंगिक छळ करतात अशी त्यांनी तक्रार केली होती. कंपनीतलं एचआर डिपार्टमेन्ट त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असं त्यांचं म्हणणं होतं. फेब्रुवारी 2022 ते मार्च 2026 दरम्यान हा सर्व प्रकार घडला. एका आरोपीने महिला कर्मचाऱ्याला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले असं पोलिसांनी सांगितलं. आरोपीने एका महिला कर्मचाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तिच्या व्यक्तिगत आणि वैवाहिक आयुष्याबद्दल घाणेरडी टिप्पणी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...