AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू मुलींना जाळ्यात अडकवून लग्न करा..; टीसीएस नाशिक धर्मांतर प्रकरणात साक्षीदारांचे धक्कादायक खुलासे

नाशिकच्या टीसीएस कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. तिला कंपनीच्या टेरेसवर एकटीला काम करायला सांगितलं जायचं आणि तिचं खाजगी सामानही जप्त केलं जात होतं.

हिंदू मुलींना जाळ्यात अडकवून लग्न करा..; टीसीएस नाशिक धर्मांतर प्रकरणात साक्षीदारांचे धक्कादायक खुलासे
नाशिक आयटी कंपनीचं प्रकरणImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 17, 2026 | 9:40 AM
Share

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीच्या नाशिक केंद्रात कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून कंपनीनेही अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. कंपनीमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2024-25 या पाच वर्षांच्या काळात लैंगिक छळाच्या तक्रारीत पाच पट वाढ झाल्याचं समोर आलं आहे. कंपनीने आपल्या वार्षिक अहवालातच ही माहिती दिलेली आहे. टीसीएस कंपनीत चार वर्षात महिलांवर अन्याय, अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मांसाहार करायला भाग पाडणं, विशिष्ट प्रार्थना, उपवास करायला लावणं असे प्रकार घडले. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. तर पोलीस कोठडीची मुदत संपल्याने ऑपरेशन विभागाच्या प्रमुख अश्विनी चैनानी यांना बुधवारी न्यायालयात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात कारागृहात असणाऱ्या दोन संशयितांनी जामिनासाठी अर्ज केले आहेत.

टीसीएसच्या नाशिक कार्यालयात कथित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या सुरू असलेल्या तपासात एक नवीन दावा समोर आला आहे. काही आरोपींनी इतरांना हिंदू मुलींशी लग्न करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप एका साक्षीदाराने केला आहे. नाशिक युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करणारे अधिकारी ज्या साक्षीची तपासणी करत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. नाशिक कार्यालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, “ते म्हणायचे जा आणि हिंदू मुलींना जाळ्यात ओढा. त्यांना तुमच्या गर्लफ्रेंड बनवा आणि त्यांच्याशी लग्न करा. ते म्हणायचे तुमचा धर्म बदला. त्यासाठी त्यांना पैसेही दिले जात होते. टीसीएसच्या एचआर मॅडम निदा खान यांनाही पैसे दिले जात होते.”

टीसीएसमध्ये सहा वर्षे काम करणाऱ्या एका तरुणीने तिचा अनुभव सांगितला आहे. नाशिक कार्यालयात बदली करण्यात आल्यानंतर तिला मुख्य इमारतीपासून वेगळ्या टेरेसवर एकटीने काम करण्यास सांगितलं गेलं. एनडीटीव्हीशी बोलताना ती म्हणाली, “मला छतावर एकटीने काम करण्यास सांगितलं. माझा फोन, बॅग जप्त करण्यात आले. जेव्हा मी वॉशरुमसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी खाली यायचे, तेव्हा सुरक्षा किंवा इतर कोणत्या तरी नावाखाली माझा मोबाईल फोन, बॅग आणि माझ्या सर्व वैयक्तिक वस्तू जप्त केल्या जात असत. कंपनीत काम करणाऱ्या अनेक तरुण कर्मचाऱ्यांचं शोषण केलं जात होतं आणि त्यांचं ब्रेनवॉशिंग केलं जात होतं. 20 ते 25 वयोगटातील तरुणींना ते सहज लक्ष्य मानायचे. त्यांना जाळ्यात अडकवणं सोपं जाईल असं, त्यांना वाटत होतं.”

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं दानिश शेख, तौसीफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सारी आणि एचआर मॅनेजर निदा खान अशी आहेत. कार्यालयाच्या वातावरणात एखादी संघटित पद्धत किंवा बळजबरीने जाळं कार्यरत होतं का याचा तपास अधिकारी करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एक विशेष तपास पथक या प्रकरणाच्या सर्व पैलूंची चौकशी करत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...