आधी दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर आणले, आता सुजय विखेंची दुसरी खुली मोहीम

भाजप खासदार सुजय विखे यांनी रुग्णांसाठी दिल्लीहून रेमडेसिव्हीर आणल्यानंतर आणखी एक मोठी घोषणा केली आहे. (sujay vikhe oxygen generator plant corona pandemic)

आधी दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर आणले, आता सुजय विखेंची दुसरी खुली मोहीम
सु
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 8:52 PM

अहमदनगर : राज्यात कोरोना रुग्णांची (Corona pandemic) संख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनची (Oxygen) मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे( Dr. Sujay Vikhe) यांनी रुग्णांसाठी दिल्लीहून रेमडेसिव्हीर आणल्यानंतर आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ते कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळ नगरमध्ये कोरोनाविरोधात लढा उभारण्यासाठी मोठी मदत होणार आहे. (BJP MP Dr. Sujay Vikhe will construct the automatic Oxygen generation plant amid Corona pandemic and Oxygen shortage)

फक्त 10 दिवसांत दीड कोटींचा ऑक्सिजन प्लांट

सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आपण पाहत आहोत. अहमदनगर जिल्ह्यालासुद्धा मागील काही दिवसांपासूनऑक्सिजन तुटवड्याचा सामना करावा लागतोय. याच गोष्टीची दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केलीये. विशेष म्हणजे अत्यंत कमी काळात म्हणजेच येत्या 10 दिवसांत हा प्लांट कार्यान्वित होणार आहे.

भारतातील पहिला स्वयंचलित ऑक्सिजन जनरेटर प्लांट

अहमदनगरमधील ऑक्सिजनची कमतरता पाहून सुजय विखे यांनी जिल्ह्यात मोठा ऑक्सिजन नजरेटर प्लांट उभारण्याचं घोषित केलं आहे. तसेच हा फ्लांट भारतातील पहिला आटोमॅटिक ऑक्सिजन जनरेट करणारा प्लांट असणार आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने सुजय विखे यांनी हा निर्णय घेतला आहे.

याआधी दिल्लीहून रेमडेसिव्हीर आणले

राज्यात कोरोना संकटात रेमडसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी चांगली आयडिया लढवली होती. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला होता. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन 300 रेमडिसिव्हर इंजेक्शन्स अहमदनगरला आणली होती.  त्यासाठी त्यांनी 22 एप्रिल पासून नियोजन सुरु केले होते. त्यानंतर रेमडेसिव्हीर यशस्वीरित्या नगरमध्ये आणल्यानंतर त्यांनी 24 एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली होती. यावेळई “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, हा ऑक्सिजनचा प्लांट उभारण्याची घोषणा केल्यानंतर इतर उद्योजकांनीसुद्धा असा प्लांट  उभा करावा ज्यामुळे ऑक्सिजनची समस्या सुटण्यास मदत होईल, असे आवाहन सुजय विखे यांनी केले आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : नांदेडमध्ये दिवसभरात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू, 769 नवे कोरोनाबाधित

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

Covishield vaccine price : राज्यांसाठी कोविशिल्ड लसीच्या दरात कपात, पुनावालांची घोषणा, नवा दर किती?

(BJP MP Dr. Sujay Vikhe will construct the automatic Oxygen generation plant amid Corona pandemic and Oxygen shortage)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.