मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचा दारुण पराभव

कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलचा मोठा विजय झाला असून या पॅनलने आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर आणि प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली आहे.

मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचा दारुण पराभव
mumbai bank election
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 11:02 PM

मुंबई बँक एम्प्लॉईज युनियनच्या मुंबई बँक युनिट निवडणुकीत शिवसेनेचे नेते ( एकनाथ शिंदे गट ) आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही. कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलने १५ पैकी सर्वच्या सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनल हे भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकीत उभे होते. त्यामुळे या बँकेवर पुन्हा भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता कायम राहिली आहे.

मुंबै बँकेवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचे वर्चस्व होते. प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच फडणवीस यांचे दुसरे खंदे समर्थक आमदार प्रसाद लाड हे देखील मुंबै बँकेचे संचालक आहेत. 2021 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या ‘सहकार पॅनेल’ ने सर्व 21 जागा जिंकून सत्ता कायम राखली होती.आता पुन्हा प्रवीण दरेकर समर्थित पॅनलने सर्व जागा मिळवल्या आहेत.

Loading...

शिवसेनेचा मोठा पराभव

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Thane District Central Co-operative Bank) निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेने मुंबै मध्यवर्ती सहकारी बँकेत (Mumbai Bank) आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली आपले पॅनल उभे केले होते. मात्र, या पॅनलचा मोठा पराभव झाला आहे. त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us