AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर, कोणा-कोणाचा समावेश?

मोठी बातमी समोर येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, आता भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर, कोणा-कोणाचा समावेश?
देवेंद्र फडणवीस Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2025 | 3:57 PM
Share

निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश? 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे,  पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर  मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुलरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी भाजप ही निवडणूक महायुतीमध्ये लढणार आहे, तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. सध्याचं राजकीय वतावरण पहाता सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, कारण यानंतर आता लगेच महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार हे देखील पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतराला देखील वेग आला आहे, महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत, यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती, मात्र या नाराजीनंतर देखील भाजपात होणारे पक्ष प्रवेश सुरूच आहेत.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...