BMC Election 2026: 70 हजार कोटींचं बजेट असणाऱ्या मुंबईत कोणता पक्ष ठरणार मोठा? सचिनपासून नाना पाटेकरांचं मतदान; आवाहन काय?

BMC Election 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. पण सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त 70 हजार कोटींचं बजेट असणाऱ्या मुंबईवर आहे... भाजप-शिवसेना युती राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे बंधूंविरुद्ध लढत आहेत. सचिन तेंडुलकर आणि नाना पाटेकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी मुंबईत मतदान करत आहेत.

BMC Election 2026: 70 हजार कोटींचं बजेट असणाऱ्या मुंबईत कोणता पक्ष ठरणार मोठा? सचिनपासून नाना पाटेकरांचं मतदान; आवाहन काय?
| Updated on: Jan 15, 2026 | 12:21 PM

BMC Election 2026: बीएमसी सोबतच महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरु आहे. भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहे. तर राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त 70 हजार कोटींचं बजेट असणाऱ्या मुंबईवर आहे… मुंबईत, भाजप विरुद्ध ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले आहे. अशात मुबंईत कोणाचं पारडं जड होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगायचं झालं तर, मुंबईत मतदान करण्यासाठी सामान्य जमतेसोबत सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

Live

Municipal Election 2026

03:28 PM

Maharashtra Municipal Election 2026 : आशिष शेलार यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच थेट सांगितला निकाल...

03:23 PM

त्यांच्या बुद्धीत हेराफेरी, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर यांच्यावर संतापले आशिष शेलार..

03:00 PM

शाई पुसली जात असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

02:47 PM

BMC Election 2026 Voting : गोरेगावमध्ये बुथ सापडत नसल्याची मतदारांची तक्रार

03:10 PM

उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा आढवा

03:10 PM

Maharashtra Election Voting Percentage : नागपूर महापालिकेसाठी किती टक्के नागरिकांनी केलं मतदान ?

सांगायचं झालं तर, महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे. पण सर्वांच्या नजरा बीएमसीवर येऊन थांबल्या आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान, मराठी महापौर, गैर मराठी महापौर आणि मुस्लिम महापौर यांच्या निवडीवरून तीव्र वाद निर्माण झाला होता. अशात मुंबईचा महापैर कोण होणर? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीसाठी 227 वॉर्ड आहेत. तर बद्दल 1700 उमेदवर मैदानात आहेत. ज्यामध्ये 822 महिला आणि 878 महिला उमेदवार आहेत.

हे सुद्धा वाचा – सेलिब्रिटींनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क, नाना पाटेकरांपासून जॉन अब्राहम पर्यंत बजावला अधिकार

महापालिका निवडणुकीत राजकीय लढाई

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमुळे गेल्या महिन्यांत नवीन पक्षांतर झाले आहेत आणि अनेक अनपेक्षित युती निर्माण झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांत्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईकरांमध्ये एक वेगळी उर्जा निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्र येवून लढत आहेत. त्यामुळे आता कोणाचा पक्ष मोठा ठरणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.