AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC New Mayor : मुंबईला कधी मिळणार नवा महापौर? काय असते निवडीची प्रक्रिया? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर…

Mumbai New Mayor : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आता मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आणि कोण महापौर होणार असा प्रश्न विचारला जात आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

BMC New Mayor : मुंबईला कधी मिळणार नवा महापौर? काय असते निवडीची प्रक्रिया? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर...
BMC New MayorImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 10:55 PM
Share

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. मुंबईत भाजपला 88 आणि शिवसेनेला 28 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 73 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 10 इतका आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर बसणार आहे. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा फारसा प्रभाव निकालावर झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 67 आणि मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आता मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आणि कोण महापौर होणार असा प्रश्न विचारला जात आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड होण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो. उद्या रात्री मुख्यमंत्री फडणवीस दावोस गुंतवणूक शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत. ते 25 जानेवारी रोजी परतणार आहेत. त्यामुळेमहापौरपदाची निवडणूक 26 जानेवारीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौरांची निवड कशी केली जाते? वाचा प्रक्रिया

मुंबई महापालिकेच्या महापौरांची थेट निवड होत नाही. बीएमसीमधील निवडून आलेले नगरसेवक आपल्यामधून महापौर निवडतात. बहुमत मिळालेल्या पक्षाच्या एका नगरसेवकाची निवड महापौर म्हणून केली जाते. आता काही दिवसांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त महापौर निवडणूक प्रक्रियेची घोषणा करतील. यानंतर महापौर श्रेणीसाठी सोडत काढली जाईल आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी निवडणूक घेतली जाईल. महापौरांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा महापौर बनवला जातो.

महापौरांच्या जबाबदाऱ्या काय असतात?

मुंबईच्या महापौरांना शहराचे ‘प्रथम नागरिक’ मानले जाते. महापौर हे मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असतात. महापालिकेच्या मासिक आणि विशेष सभा बोलावणे आणि त्यांचे अध्यक्षपद भूषवणे ही महापौरांची मुख्य जबाबदारी असते. सभागृहात विविध नागरी प्रश्नांवर होणाऱ्या चर्चेचे नियमन करणे आणि प्रस्तावांवर मतदान घडवून आणणे. सभागृहात लोकशाही मार्गाने कामकाज चालेल आणि शिस्त पाळली जाईल याची खात्री करणे ही काही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

Follow Us
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर