मोठी बातमी! संपूर्ण वर्षभरासाठी फटाक्यांवर बंदी! उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याबाबत महत्त्त्वाचा निर्णय दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास पूर्ण वर्षभरासाठी बंदी असेल, न्यायालयाने सांगितलेय.

मोठी बातमी! संपूर्ण वर्षभरासाठी फटाक्यांवर बंदी! उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय
firecracker and mumbai high court news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 6:44 PM

Firecracker Ban : सण आणि उत्सवात फटाके फोडून उत्सव साजरा केला जातो. आता सणासुदीच्या काळात तर सार्वजनिक ठिकाणीही फटाके फोडले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूष होते. तशा तक्रारीही लोकांकडून केल्या जातात. दरम्यान, हीच बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय घेतलाय.   सार्वजनिक ठिकाणी फटाके बंदी ही संपूर्ण वर्षभरासाठी असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तजवीज करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याबाबत महत्त्त्वाचा निर्णय दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास पूर्ण वर्षभरासाठी बंदी असेल, न्यायालयाने सांगितलेय. तसेच  ही बंदी सर्व उत्सवांमध्ये लागू असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही न्यायालयाने घेतलाय. यासंदर्भात वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये व्यापक जनजागृती कारवी, असा आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलाय. लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी सेलिब्रिटींचीही मदत घ्यावी असे न्यायालयाने सरकारला सूचवले आहे. हे निर्देश केवळ यंदाच्या दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता भविष्यातही कायम लागू ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असेही न्यायालयाने सांगितले. फटाक्यांची निर्मिती तसेच विक्रीवर कोर्टाने कोणतीही बंदी घातलेली नाही. फक्त सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी असेल.

Loading...

सरकार निर्णयाची अंमलबजावणी कसे करणार?

दरम्यान, सणांच्या काळात फटाक फोडले जातात. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. फटाके फोडण्याबाबत काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. परंतु अजूनही त्याचे पालन केले जात नाही. आतापर्यंत अनेकदा न्यायालयीन लाढाई झालेली आहे. असे असताना मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता सरकार या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कसे करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कोणत्या सेलिब्रिटींची मदत घेतली जाणार, त्यासाठी नेमका प्लॅन काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us