Shweta Mahale : प्रत्येकाने आपापला मतदार संघ संभाळावा, श्वेता महालेंकडून शिंदेंच्या आमदाराला सूचक शब्दात समज, बाहेरचे येऊन नासवतात..

Shweta Mahale : "बुलढाणा विधानसभेची वस्तुस्थिती सांगितली पण कुणाला वाटत असेल की त्यांच्याबाबतीत बोलले तर काय करणार?" असं श्वेता महाले म्हणाल्या. "हा जिल्ह्यातील विषय आहे. प्रत्येकाने आपापला मतदार संघ संभाळावा"

Shweta Mahale : प्रत्येकाने आपापला मतदार संघ संभाळावा, श्वेता महालेंकडून शिंदेंच्या आमदाराला सूचक शब्दात समज, बाहेरचे येऊन नासवतात..
Shweta Mahale
| Updated on: Sep 29, 2026 | 6:30 PM

गणेश सोलंकी, प्रतिनिधी : बुलढाण्यामध्ये सध्या स्थानिक राजकारण तापलं आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले विरुद्ध बुलढाण्याचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बुलढाण्याचा बिहार झाला आहे असं श्वेता महाले म्हणाल्या. त्याला लगेच आमदार संजय गायकवाड यांनी “रात्री बारा वाजता एकटी मुलगी बुलढाण्यामध्ये फिरू शकते आणि याला जर ते बिहार समजत असतील तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते” असं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर श्वेता महाले आता पुन्हा एकदा बोलल्या आहेत. “महायुती धर्माचं पालन सगळ्यांनी करावं. बाहेरचे लोक येऊन माझ्या मतदार संघात अराजकता माजवत आहेत. चुकीची माहीती देत आहेत” असं त्या म्हणाल्या.

“बुलढाणा विधानसभेची वस्तुस्थिती सांगितली पण कुणाला वाटत असेल की त्यांच्याबाबतीत बोलले तर काय करणार?” असं श्वेता महाले म्हणाल्या. “हा जिल्ह्यातील विषय आहे. प्रत्येकाने आपापला मतदार संघ संभाळावा. माझ्या मतदार संघात भाजप शिवसेना चांगेल संबंध आहेत. बाहेरचे येऊन नासवतात. शिवीगाळ करणं , पातळी सोडून बोललं की त्रास होतोच” असं श्वेता महाले म्हणाल्या.

Loading...

कॉलर पकडणं हे योग्य नाही

“वस्तूस्थिती काय ते सगळ्यांना माहितीय. माणूसकी, नैतिकता ठेवून राजकारण करायला हवं. गुंडागर्दी करणं, मारामारी करणं, बाप काढणं, कॉलर पकडणं हे योग्य नाही. कुणी लढायचं नाही, लढायचं ह्याचा निर्णय पक्ष घेईल” असं त्या म्हणाल्या. “जिजाऊंचा जिल्हा म्हणून बुलढाणा प्रख्यात आहे. जाणिवपूर्वक यायचं, महिलांना लज्जा निर्माण होईल असं वक्तव्य करायचं हे योग्य नाही” असं श्वेता महाले म्हणाल्या.

संजय गायकवाड काय म्हणाले?

“बुलढाण्याचा बिहार झाला म्हणतात, पण कमीत कमी आरोप करताना इतिहास पाहिला पाहिजे. ज्या माणसाने मुलींचे संसार बसवण्यासाठी स्वतःचे रक्त सांडले. साडेसात हजार मुलींचे संसार बसविले” असा दावा संजय गायकवाड यांनी केला. “जिल्ह्यातील अनेक पळून गेलेल्या मुली मी परत आणल्या” असं संजय गायकवाड म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us