AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात खळबळ, बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर, निवडणुकीच्या तोंडावर पालघरमधून मोठी अपडेट!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर यांना पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे. वसई विरार महापालिकेतील 71 नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्याच्या राजकारणात खळबळ, बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर, निवडणुकीच्या तोंडावर पालघरमधून मोठी अपडेट!
kshitij thakurImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2026 | 4:57 PM
Share

Kshtij Thakur : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी राजकीय सोय लक्षात घेऊन कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाचा पत्ता कट करायचा, याचा विचार राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना थेट आमदारकीची ऑफर दिली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या या बच्चू कडू पॅटर्नची सगळीकडेच चर्चा झाली. आता शिंदे पुन्हा एकदा असाच काहीसा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकरून यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे क्षितीज ठाकूरही लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर यांना पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे. वसई विरार महापालिकेतील 71 नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. रवींद्र फाटक यांचे तिकीट कापून हितेंद्र ठाकूरांचे पुत्र माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.

क्षितीज ठाकूर शिवसेनेचे उमेदवार

या विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ‘बच्चू कडू पॅटर्न’ राबवणार असल्याचे बोलले जात आहे. बविआचे क्षितिज ठाकूर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. क्षितीज ठाकूर यांचा लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे. ते लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अधिकृत शिवसेनेत होणार करण्याची शक्यता आहे. क्षितीज ठाकूर यांचा पक्षप्रवेश करून ठाणे पालघर विधानपरिषदेमधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांना संधी दिली जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची व्यक्त केली आहे. दरम्यान ही शक्यता खरी ठरल्यास बच्चू कडू यांच्याप्रमाणाचे क्षितीच ठाकूर हेदेखील शिवसेनेत दाखल होऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय काय होणार आहे, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी