AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, कोण आहेत आकाश मोरे?

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आकाश मोर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, कोण आहेत आकाश मोरे?
akash moreImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 9:10 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसच्या वतीने आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होता. परंतु या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं काँग्रेसकडून आधीच जाहीर करण्यात आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत आकाश मोरे? 

काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आकाश मोरे हे काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव आहेत. आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे विधानपरिषदेवर आमदार होते.  आकाश मोरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसचे निष्ठावान समजले जातात. आकाश मोरे हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील चेहरा आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं निर्णयाक मतदान आहे, त्यामुळे काँग्रेसने यावेळी धनगर समाजाचे असलेल्या आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीच्या दौऱ्यावर असून, उद्याच आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं मतदान जास्त असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....