नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : नितीन गडकरी

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari nagpur) यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला.

Nitin Gadakari nagpur, नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : नितीन गडकरी

नागपूर : नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari nagpur) यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला. यावेळी जेष्ठ सिने कलाकार नाना पाटेकर उपस्थित होते.

“महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी (Nitin Gadakari nagpur) यांनी दिला.

नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला उद्योजिका मेळावा नागपूर महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी भाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारेचे छोटे छोटे उद्योग यात सहभागी झाले होते.

“गडकरी अस व्यक्तिमत्व आहे ते ज्या कामाला हात लावतात ते सहज पूर्ण होते. सोबतच गडकरी दुसऱ्याचे कान टोचतात पण ते सुद्धा प्रेमाने विरोधक सुद्धा त्यांचा विरोध करत नाही”, असं नाना पाटेकर म्हणाले.

“नामच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात केली आणि 60 कोटी रुपये सामान्य माणसाने दिले हे सगळ्यात मोठ आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जेवढं जमते तेवढं आपण करावं. नोकऱ्या कमी होतात त्यामुळे आपण उद्योजक नोकरी देणारे कसे होऊ हे बघितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला अजून भाव मिळत नाही. पण मॉलमध्ये जाऊन आपण त्या मालाला किंमत देता”, असंही यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *