
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितापेक्षा काही मोठा नाही, असं म्हणत युतीची तयारी दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्या घडणाऱ्या घडामोडी या युतीच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार होत असल्याचे संकेत देत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये युती संदर्भात थेट बोलण झालं का? या बद्दल माहिती नाहीय. पण खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलन सुरु झालय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही ठाकरे बंधुंसमोर युतीचा हाच एक चांगला पर्याय आहे. कारण पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी अशा प्रकारच पाऊल उचलण्यात दोन्ही ठाकरेंचा फायदा आहे. आता या संभाव्य युतीवरुन माजी खासदार आणि मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा खुलासा केला आहे.
राज-उध्दव एकत्र येण्यावरून चंद्रकांत खैरे यांचा मोठा खुलासा. “राज-उध्दव एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती. बैठकीत उध्दव ठाकरे युतीसाठी तयार असल्याच खैरे यांनी सांगितलं. आपण हात पुढे करायला तयार आहोत, ते टाळी देतात का पाहू. या युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर दिली होती. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील. सामना वर्तमानपत्राचे पान दाखवत एकत्र येण्याचा केला दावा” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. चंद्रकांत खैरे यांच्या खुलाशयामुळे राज उध्दव यांची जवळीक वाढल्याचा अंदाज आहे.
युती झाल्यास पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटणार
अमरावतीमध्ये उध्दव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेना-मनसे युतीचा विजय असो अशी घोषणाबाजी. आवाज कुणाचा शिवसेना-मनसे युतीचा अशी घोषणाबाजी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अमरावतीमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांनी वर्तवली इच्छा. मुंबईत युती झाल्यास पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटणार मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा निर्धार. अमरावतीत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची चाय पे चर्चा.
मराठी माणसाला सुगीचे दिवस येतील
यवतमाळ जिल्ह्यात मनसे आणि उबाठा सेनेच्या युतीच्या चर्चानी जोर धरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी या युतीमुळे राज्यात नवं समीकरण येईल का? असा सवाल केला जातोय. कधीकाळी एकाच छता खाली असलेल्या या दोन पक्षांनी दोन मार्ग निवडले होते. मात्र अनेक तपानंतर मनसे-सेना राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्ते यांनी सुद्धा हे दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र यावे, यामुळे मराठी माणसाला सुगीचे दिवस येतील अशा विश्वास व्यक्त केला आहे .