Chandrakant Patil : फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा, चंद्रकांत पाटलांचं विधान

| Updated on: Jul 16, 2022 | 3:48 PM

आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडावा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलं आहे. त्यामुळे पुन्हा राजकारणात गरमागरमीचा माहोल तयार झाला आहे.

Chandrakant Patil : फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा, चंद्रकांत पाटलांचं विधान
फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा, चंद्रकांत पाटलांचं विधान
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सरकार पडण्याच्या रोज नव्या तारखा देत होते. मात्र गेल्या अडीच वर्षात चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या तारखा त्यांनाच हुलकावण्या देत होत्या. मात्र अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने तो दिवस उजाडला आणि ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आलं. त्यानंतर आज चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा चिमटे काढले आहेत. हे सरकार पडणार होते हे त्यांनाही माहित होतं. म्हणूनच यांनी काही केलं नाही, तसेच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडावा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलं आहे. त्यामुळे पुन्हा राजकारणात गरमागरमीचा माहोल तयार झाला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

आज मुंबईत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्रजी सभेत बोलले की मी सगळ्यांना माफ केलं, पण आम्ही करणार नाही. देवेंद्रजी यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडला पाहिजे आणि एक कडक आमदार नेमला पाहिजे जो मागच्या अडीच वर्षाच्या काळातील घोटाळ्याची यादी तयार करेल, असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

शेवटी सरकार आलेच

तसेच गेले अडीच वर्ष आपण सगळ्यांनी त्याची वाट पाहिली आहे, रात्रीनंतर दिवस येतो असं बोलतात पण हे खरं झालं आहे. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाचे सरकार आलं आहे. सगळ्यांची इच्छा आहे की त्यांना एक उत्तम स्थान मिळावं. माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं ठरलं होतं की वेळ येईपर्यंत काहीच बोलायचं नाही. मी वारंवार बोलायचो सरकार येईल पण आत्ता आलंच, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीने काही केलं नाही

एवढ्या राज्याचा कारभार चालवताना सगळ्याच गोष्टी शक्य झाल्या नाहीत. विनायक मेटे यांना 2014 पासून योग्य सन्मान मिळाला नव्हता, पण आता ती वेळ आली आहे असं वाटते आहे. अजूनही खूप अनिश्चितता आहे, सूर्य अजूनही स्पष्ट दिसत नाही आहे, कोण आमदार आहे? कोण अंधारात आहे? हे देखील दिसत नाहीये. मात्र मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तो पर्यंत न्याय मिळाला. गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण नाही दिलं, ओबीसी आरक्षण घालवलं, धनगर समाजाला विचारलं नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.