निवडणूक चिन्हही काळानुसार बदलले, बघा नवे काय आले?

जिल्ह्यातील 629 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (gram panchayat election) तब्बल 12 हजार 212 नामांकन अर्ज वैध ठरले आहेत. (Chandrapur grampanchayat election upate )

निवडणूक चिन्हही काळानुसार बदलले, बघा नवे काय आले?
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलेले उमेदवार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये अशा प्रकारे गर्दी करत आहेत.
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील 629 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (gram panchayat election) तब्बल 12 हजार 212 नामांकन अर्ज वैध ठरले आहेत. येत्या 15 जानेवारीला येथे मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये चांगल्या आणि आकर्षक अशा निवडणूक चिन्हावर प्रत्येक उमेदवाराचा डोळा आहे. चांगले आणि सर्वपरिचित निवडणूक चिन्ह मिळाले, तर मतदारांना मतदान करण्यास सोपे होईल, असा या मागचा उमेदवारांचा उद्देश आहे. 4 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. (Chandrapur district gram panchayat election detailed current update)

राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदानासाठी तब्बल 190 निवडणूक चिन्हांची यादी जारी केली आहे. यामध्ये प्रथमच संगणकाचा माऊस, पेनड्राईव्ह आणि मोबाईल चार्जरचा समावेश केला आहे. निवडणुकीत हमखास विजय मिळावा, या हेतूने दैनंदिन वापराशी निगडित आणि आकर्षक चिन्हांवर उमेदवारांचा डोळा आहे. 4 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

जिल्ह्यात एकूण 5 हजार 151 सदस्य निवडून देण्यासाठी सुमारे 19 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सध्या गावागावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आलाय. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि समर्थक गावांना भेटी देत आहेत. रात्री उशिरापर्यंत गावाच्या चावडीवर गप्पांचा फड रंगू लागला आहे. यावेळी 190 चिन्हांचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून एकाच चिन्हाची निवड करावी लागणार आहे.

दरम्यान, निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून चांगलीच तयारी सुरु आहे. निवडणूक चिन्ह घेण्यापासून ते मतदारांनी मतदान करण्यापर्यंत सर्व रणनीती आखली जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत केवळ 48 चिन्हांचा समावेश होता. इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडे निवडणूक नियमावली आणि अटींबाबत चर्चा करीत आहेत.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी! जावळीतल्या 75 पैकी 30 ग्रामपंचायती बिनविरोध

महाराष्ट्रातील ‘या’ गावात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची 67 वर्षाची परंपरा आजही कायम

(Chandrapur district gram panchayat election detailed current update)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.