AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वादाच्या चर्चेदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, दिली मोठी अपडेट

१७ विधान परिषदेच्या जागांवरुन राष्ट्रवादी पक्षाची आज बैठक झाली. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

मोठी बातमी! वादाच्या चर्चेदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, दिली मोठी अपडेट
Deputy Chief Minister Sunetra Pawar and leaders of the nationalist party
| Updated on: May 29, 2026 | 8:23 PM
Share

राज्यात १७ जागांवर विधानपरिषदेच्या निवडणूका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रायगडच्या विधानपरिषदेत वरुन संघर्ष सुरु असतानाच आज राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. देवगिरी बंगल्यावरील बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या वाद झाल्याचीही बातमी आली होती. यावर उभय नेत्यांनी मिडीयासमोर स्पष्टीकरण दिले आहे.

उद्या दुपारपर्यंत निर्णय होईल

राज्यात १७ विधान परिषदेच्या जागांवरुन महायुतीत समन्वयाने चर्चा सुरु आहे. या निवडणूकांवरुन आमच्यातील कोणी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. येऊ घातलेल्या निवडणूकात महायुतीला निर्भेळ यश मिळवायचे असल्याने चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो. उद्यापर्यंत आम्हाला वेळ आहे. उद्या दुपारपर्यंत जागाचे नक्की होईल असे खासदार सुनीट तटकरे यांनी यावेळी सांगितले.

‘हम साथ साथ है…काही वाद नाही…’

राष्ट्रवादी पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि खासदार सुनील तटकरे यांच्या खंडाजंगी झाली होती. या संदर्भात विचारले असता मंत्री छगन भुजबळ यांनी कोणताही वाद झाला नव्हता. केवळ मला बोलायचे असल्याने मी त्याला थांबायला सांगितले, आता आम्ही एकत्र आहोता. ‘हम साथ साथ है…काही वाद नाही…’ कधी कोणी जास्त ‌बोललं तर आपण बोलतो थांबा जरा तसं झालं होते असेही छगन भुजबळ यांनी सांगत सुनिल तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद झाला नव्हता असे सांगितले.

देवगिरी बंगल्यावरील वादळी बैठक

26 मे रोजी मंगळवारी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची बैठक नेत्या सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या बैठकीला मुंबईत असूनही ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल उपस्थित राहिले नव्हते. तसेच या बैठकीत पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या पश्चात आम्ही पक्ष वाढवत आहोत. तर आमच्यावर जेव्हा टीका होते, तेव्हा पक्षातील कोणत्याही नेत्यांद्वारे त्याचे खंडन केले जात नाही असा त्रागा व्यक्त केला होता. आम्ही दोघेचे टीकेचे धनी का ? असा सवालही यावेळी सुनील तटकरे यांनी केला होता. त्याला आक्षेप घेत हे मुद्दे येथे मांडू नका, आता झाले गेले विसरा असे म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवले होते. यावेळी दोन्ही नेत्यात वाद झाले होते. तसेच सुनील तटकरे यांच्या भाषण सुरु असताना पार्थ पवार निघून गेले होते. तसेच याच बैठकीत पक्षाच्या नेत्या सूनेत्रा पवार यांनी वारंवार मागूनही आपल्याला भाजपा अर्थ खाते देत नाही अशीही खंत व्यक्त केली होती.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट