AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारंवार मागणी करुनही भाजप अर्थ खाते देत नाही, सुनेत्रा पवार यांची नाराजी

मुंबईत आज देवगिरी बंगल्या राष्ट्रवादीच्या आजी आणि माजी आमदारांची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या बैठकीत विविध विषय चर्चेला होते. या बैठकीत पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी अर्थखात्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

वारंवार मागणी करुनही भाजप अर्थ खाते देत नाही, सुनेत्रा पवार यांची नाराजी
sunetra pawar
| Updated on: May 26, 2026 | 10:45 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर १३ दिवसांनी त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला होता. सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील झाल्या.महायुतीत भाजपाचा सहकारी असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला मात्र डावलेले जात असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना वाटत आहे. कारण आज त्यांनी पक्षाच्या बैठकीत अर्थ खाते राष्ट्रवादीला देत नसल्याने खंत व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी थेट असे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण आता कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी – माजी आमदारांची आज देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या वाटचाली बद्दल आणि विधान परिषदेच्या निवडणूकांबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीत पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळत नसल्याने खंत व्यक्त केली आहे. अजित पवार असताना अर्थखाते त्यांच्याकडे होते. या न्यायाने हे खाते राष्ट्रवादीला मिळावे अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करून सुद्धा भाजपकडून अर्थ खाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीत व्यक्त केली नाराजी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पश्चात पक्षाची सर्वसूत्रे आपल्या हाती घेतली होती. अजितदादा यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खाते स्वत:कडे ठेवले आहे. आणि अर्थसंकल्पयी अधिवेशनात स्वत: अर्थसंकल्प मांडला. आज मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर तरी राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागूनही अर्ख खाते भाजप देत नसल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

अर्थ खाते का महत्वाचे

अर्थ खाते हे महत्वाचे असते.आमदारांना आमदार निधीसह इतर खर्चाचे अधिकार मिळत असल्याने अर्थ खाते आणि गृहखाते अशी महत्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचा राजकीय नेत्यांचा कल असतो.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट