Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील मांजरी येथे गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोडग्यानंतर आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या एकूण १८ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या मागण्यांमध्ये १२,५०० जागांची पदभरती सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन […]
पुण्यातील मांजरी येथे गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोडग्यानंतर आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या एकूण १८ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या मागण्यांमध्ये १२,५०० जागांची पदभरती सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रमुख होते. तसेच, मेस सुविधा आणि सेंट्रल किचन पद्धत बंद करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.
सरकारने आजच या संदर्भात दोन जीआर (शासकीय निर्णय) काढले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली. सुरुवातीला काही उपोषणकर्ते उपोषण सोडण्यास तयार नव्हते, मात्र शिष्टमंडळाने त्यांची समजूत काढल्यानंतर उपोषण स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. आश्वासनांची अंमलबजावणी होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्राच्या राजधानीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
Published on: Aug 29, 2026 10:45 PM
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज

