AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 सेकंदाचाही विलंब झाला असता तर… चिमुकल्या लेकींचा हात धरून आईची धडपड, नेपाळमध्ये तो व्हिडीओ पुढे

नेपाळमध्ये पुराने मोठे थैमान घातले. अजूनही बचावकार्य राबवले जात आहे. नेपाळमधील धक्कादायक व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. 2000 पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

2 सेकंदाचाही विलंब झाला असता तर... चिमुकल्या लेकींचा हात धरून आईची धडपड, नेपाळमध्ये तो व्हिडीओ पुढे
Nepal floods
| Updated on: Aug 30, 2026 | 9:15 AM
Share

निसर्गाच्या प्रकोप नेपाळमध्ये बघायला मिळाला. मोठा पूर नेपाळमध्ये आला. या पुरात सर्वकाही वाहून गेले. लोकांची घरे गेली. अजूनही बचावकार्य सुरू आहे. 2000 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा 600 च्या वर पोहोचला आहे. भारतात 3 प्रेत वाहून आलीत. नेपाळमधील स्थिती अत्यंत भीषण आहे. चिखलातून लोकांना काढले जात आहे. अनेक व्हिडीओ नेपाळमधील पुढे आली. तिथे परिस्थिती किती जास्त भयंकर होती आणि अजूनही आहे हे दिसतंय. नेपाळला मदतीकरिता भारत पुढे आला. भारतीय लष्कराचे विमाने नेपाळला मदत घेऊन तात्काळ पोहोचले. भारताने बचाव कार्यात मदत करण्याचाही प्रस्ताव दिला. भारतासोबतच इतरही देश नेपाळच्या या वाईट काळात मदतीकरिता धावून आले. नेपाळमध्ये किती मोठा प्रकोप निसर्गाने केला, त्यानंतर स्थिती काय आहे हे व्हायरल व्हिडीओवरून कळतंय.

30 देशांचे नागरिक बेपत्ता आहेत. काही भारतीय नागरिकांसोबतही संपर्क होऊ शकला नाही. ज्यांच्यासोबत संपर्क झाला, त्यांना सुरक्षित भारतात आणले जात आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओत अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येताना दिसत आहे. मोठा पूर आला. तिथे असलेले एक दोन मजली घर पहिल्याच झटक्यात या पाण्यासोबत थेट वाहून जाताना दिसत आहे.

पाणी इतक्या जास्त वेगाने आले की, घर कोसळले. पाण्याचा वेग प्रचंड होता. त्याचाच बाजूला काही लोक उभी आहेत. त्यात एक आई आणि दोन शाळेतून आलेल्या मुली दिसत आहेत. हे पाहून क्षणाचाही विचार न करता आई आपल्या मुलींच्या हाताला पकडते आणि पळत वर घेऊन येते. यादरम्यान सुरूवातीला ही आई रस्त्यावर पडतेही. हे सर्वजण डोंगरावर पळून येताना दिसत आहेत. दोन चिमुकल्या मुली आपल्या आईच्या हाताला धरून पळत आहेत.

शाळेतून आलेल्या या मुली दिसत असून शाळेचा गणवेश आणि आयकार्ड त्यांच्या गळ्यात दिसत आहे. क्षणाचाही उशीर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. यासोबतच नेपाळच्या पुरामध्ये एक ग्रीन हाऊस तूफान चर्चेत आले. या घराच्या आजुबाजूचे घर पुरात वाहून गेले. फक्त एक दोन मजली ग्रीन मजली घर सुरक्षित राहिले. पहिल्या मजल्याला नुकसान झाले.

या घरातील लोक मदत मागताना दिसत होते. चारही बाजूने पाणीच पाणी. त्यातच शेजारचे घर पुरात वाहून गेले. ग्रीन घराचे व्हिडीओ तूफान व्हायरल झाली. आता याच घरातील लोक सुरक्षित राहिले की, नाही असा सवाल लोक उपस्थित करत होते. आता याचा एक व्हिडीओ पुढे आला. या घरातून लोकांना बचाव पथकाकडून सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे, हे दिसत आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक