Ramayana : आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ची रेकॉर्डब्रेक कामगिरी; 23 व्या दिवशी आपल्या नावावर केले 5 मोठे विक्रम
Ramayana : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री रणबीर कपूर स्टारर 'रामायण' सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 'रामायन'ने 23 व्या दिवशी रचले 5 मोठे रेकॉर्ड्स स्वतःच्या नावावर केले आहे. जाणून घ्या सिनेमाचे रेकॉर्ड्स

Ramayana : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे, म्हणूनत सलग 24 व्या दिवसापर्यंत सिनेमा बॉक्स ऑफिसवर असलेली पकड मजबूत दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवस झाले असले, तरी त्याची कमाई करण्याची गती कायम आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. यासह ‘रामायण’ हा 1 हजार कोटींच्या क्लबमध्ये सर्वात वेगाने प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. एवढंच नाही, तर बॉलिवूडच्या इतिहासात 1 हजार कोटींची कमाई करणारा पहिला नॉन-सीक्वेल सिनेमा होण्याचा मानही त्याने मिळवला आहे.
‘रामायण’ने 23 व्या दिवशी रचेल 5 मोठे रेकॉर्ड्स
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने 23 दिवसांत भारतात 1 हजार कोटी 55 लाख रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. यासह सर्वात वेगाने 1 हजार कोटींचा टप्पा गाठणाऱ्या सिनेमांच्या यादीत या ‘रामायन’ने तिसरं स्थान मिळवलं आहे. या यादीत ‘पुष्पा 2’ पहिल्या, तर ‘धुरंधर 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, ‘रामायण’ने ‘बाहुबली 2’लाही मागे टाकले आहे.
भारतात 1 हजार कोटींचा टप्पा सर्वात वेगाने गाठणारे सिनेमे
पुष्पा 2 –1,234.10कोटी रुपये, 16 दिवसांत सिनेमाने इतकी कमाई केली आहे.
धुरंधर 2 – 1,234.10 कोटी रुपये, 18 दिवसांत सिनेमाने इतकी कमाई केली आहे.
रामायण – 1,000.55 कोटी रुपये, 23 दिवसांत सिनेमाने इतकी कमाई केली आहे.
बाहुबली 2 – 1,030.40 कोटी कोटी रुपये, 35 दिवसांत सिनेमाने इतकी कमाई केली आहे.
‘रामायण’ने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटी रुपयांचा नेट कलेक्शनचा टप्पा पार करणारा हा बॉलिवूडमधील पहिला नॉन-सीक्वेल सिनेमा ठरला आहे.
त्याचप्रमाणे 1 हजार कोटींचा टप्पा पार करणारा हा बॉलिवूडमधील दुसरा सिनेमा ठरला आहे. याआधी ‘धुरंधर 2’ने हा विक्रम केला होता. याशिवाय, सर्व भाषांमध्ये 1 हजार कोटींची कमाई करणारा ‘रामायण’ हा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. दरम्यान, रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ सिनेमाने जगभरातही दमदार कामगिरी केली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या 23 दिवसांत सिमेमाने जगभरात तब्बल 1 हजार 790.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे आता या सिनेमाची 10 हजार 800 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
