AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: हिवाळ्यात तोंडातून वाफ का बाहेर येते? जाणून घ्या यामागचं रंजक विज्ञान!

हिवाळ्यात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, बोलताना तुमच्या तोंडातून वाफ बाहेर पडते, जी धुरासारखी दिसते. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, असे फक्त हिवाळ्यातच का घडते, उन्हाळ्यात का नाही? याचे उत्तर येथे जाणून घ्या.

GK: हिवाळ्यात तोंडातून वाफ का बाहेर येते? जाणून घ्या यामागचं रंजक विज्ञान!
breath fog up in winter science
| Updated on: Nov 29, 2026 | 2:11 PM
Share

हिवाळा आला की गुलाबी थंडी पडते. या थंडीत सकाळी किंवा रात्री बाहेर पडलात तर तुमच्या तोंडातून धुरासारखी पांढरी वाफ बाहेर पडू लागते. ही वाफ अगदी धुरासारखी दिसते. मात्र, हा धूरही नसतो आणि केवळ वाफही नसते. तर ही एक सामान्य वैज्ञानिक प्रक्रिया आहे, जिला ‘कंडेन्सेशन’ किंवा ‘सांद्रीभवन’ असे म्हणतात. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? ही कशी होते? वाफ का येते? याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.

नेमकं काय घडतं?

आपल्या फुफ्फुसांच्या आणि श्वसनमार्गांच्या आतील स्तर नेहमी ओलसर असतात. आपण श्वास घेतो तेव्हा हवा या ओलाव्यातून प्रवास करते आणि शरीराच्या तापमानाइतकी गरम होते. परिणामी, आपण बाहेर सोडलेली हवा उबदार असते आणि त्यात भरपूर पाण्याची वाफ असतो. या वाफेची आर्द्रता पातळी जवळजवळ १०० टक्के असते. ही वाफ वायुरूपात असल्याने ती उघड्या डोळ्यांना दिसत नाही. थोडक्यात सांगायचे तर, कोणत्याही ऋतूत आपल्या श्वासात पाणी असते; फक्त ते नेहमी डोळ्यांना दिसतेच असे नाही.

थंड हवेत नेमकं काय घडते?

या वाफेमागचं खरे रहस्य हवेच्या पाणी साठवून ठेवण्याच्या क्षमतेमध्ये दडलेले आहे. उबदार हवा अधिक आर्द्रता धरून ठेवू शकते, तर थंड हवेची क्षमता कमी असते. जेव्हा आपला उबदार आणि आर्द्रतेने भरलेला श्वास हिवाळ्यातील थंड हवेच्या संपर्कात येतो, तेव्हा तो वेगाने थंड होऊ लागतो. जेव्हा तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या खाली याला दव बिंदू म्हणतात. यामध्ये तेव्हा हवा त्यातील अतिरिक्त बाष्पाला वायुरूपात टिकवून ठेवू शकत नाही. त्यानंतर वाफेचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये होते. हे थेंब इतके हलके असतात की ते हवेत तरंगत राहतात आणि प्रकाशाला सर्व दिशांना विखुरतात. म्हणूनच आपल्याला पांढऱ्या धुक्यासारखा भास होतो. ढग आणि धुके तयार होण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सारखीच असते; फरक फक्त इतकाच की, आपल्या तोंडासमोर तयार होणारा हा ‘छोटा ढग’ काही सेकंदच टिकतो.

ही वाफ आहे की अजून काय?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, खरी वाफ किंवा पाण्याची वाफ हा एक अदृश्य वायू असतो. हिवाळ्यात दिसणारे पांढरेशुभ्र धुके म्हणजे प्रत्यक्षात पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब असतात. चहाच्या किटलीतून वर येणारी पांढरी ‘वाफ’ देखील अशीच असते; गरम पाण्यामधून बाहेर पडणारी अदृश्य वाफ जशी थंड हवेच्या संपर्कात येते, तसे तिचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये होते. सामान्य भाषेत आपण याला ‘वाफ’ असेच म्हणतो आणि तसे म्हणणे चुकीचेही नाही.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!