AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 1800 कोटींची कमाई केलेला आदिनाथ कोठारेचा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? 450 कोटींच्या डीलबद्दल निर्माते म्हणाले..

'रामायण' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत निर्माते नमित मल्होत्रा यांनी मोठा खुलासा केला आहे. 450 कोटींच्या डिजिटल डीलच्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून, चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तब्बल 1800 कोटींची कमाई केलेला आदिनाथ कोठारेचा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? 450 कोटींच्या डीलबद्दल निर्माते म्हणाले..
आदिनाथ कोठारेImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2026 | 2:08 PM
Share

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहिल्यानंतर आता अनेकजण त्याच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या डिजिटल राइट्ससाठी तब्बल 450 कोटी रुपयांची डील झाल्याची चर्चा होती. मात्र, आता चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनीच याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘रामायण’चे ओटीटी राइट्स अद्याप कोणत्याही प्लॅटफॉर्मला विकलेले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार, याबाबतचं गूढ आणखी वाढलं आहे.

450 कोटींच्या OTT डीलचं काय झालं?

‘रामायण’च्या डिजिटल राइट्सबाबत यापूर्वी अनेक बातम्या समोर आल्या होत्या. जिओ हॉटस्टारने तब्बल 450 कोटी रुपयांची डील करून या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकत घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, नमित मल्होत्रा यांनी या वृत्तांवर स्पष्टीकरण दिलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, अद्याप कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत डिजिटल राइट्सची डील झालेली नाही. सध्या याबाबत चर्चा सुरू असली तरी लगेचच चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा कोणताही विचार नाही.

‘आधी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहा’

ओटीटी रिलीजबाबत बोलताना नमित मल्होत्रा यांनी चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचं आवाहन केलं. ‘रामायण’मधील संगीत आणि व्हिज्युअल्सचा अनुभव प्रेक्षकांनी थिएटरमध्येच घ्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागू शकते. सध्या तरी ओटीटी रिलीजची कोणतीही निश्चित तारीख किंवा प्लॅटफॉर्म जाहीर करण्यात आलेला नाही.

‘रामायण’चा दुसरा भाग कधी येणार?

दरम्यान, ‘रामायण’च्या दुसऱ्या भागाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग आधी दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित करण्याचं नियोजन होतं. मात्र, आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरा भाग दिवाळी 2028 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या भव्य सिनेमॅटिक विश्वाचा पुढचा भाग पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

थिएटरनंतरच ओटीटीवर येणार ‘रामायण’

‘रामायण’च्या ओटीटी रिलीजबाबत यापूर्वी जिओ हॉटस्टारसोबत पे-पर-व्ह्यू पद्धतीने भागीदारीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र, नमित मल्होत्रा यांच्या ताज्या वक्तव्यामुळे डिजिटल राइट्सच्या व्यवहाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या तरी चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे निर्माते याबाबत पुढे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!