डिलिमिटेशन बिलावर ठाकरेंची खेळी, असीम सरोदे यांची बंडखोर खासदारांबद्दल पोस्ट, थेट कायद्याच्या..
शिवसेना ठाकरे गटाने डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यात मोठा गेम केला. त्यांनी 6 फुटीर खासदारांना व्हीप जारी केले. आज बैठकीचे आयोजन करण्यात आले. याच बैठकीचे नियंत्रण शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी देण्यात आले.

डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यात शिवसेना ठाकरे गटाने मोठी खेळी खेळली. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी आजच्या बैठकीचे व्हीप जारी करण्यात आले. जर हे खासदार या बैठकीत सहभागी झाले नाही तर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. त्यातच आता असीम सरोदे यांनी या मुद्द्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यांनी या मुद्द्यात काही गोष्टी मांडल्या आहेत. असीम सरोदे यांनी म्हटले की, मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार? शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजपचे लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली.
या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत. त्यामुळेच त्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे अशी स्पष्ट सूचना देणार राजकीय पक्ष शिवसेनेचा व्हीप त्याना इशू करण्यात आलेला आहे.
आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बील च्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील. अपात्रतेबाबतची परिच्छेद 2(1)b ची तरतूद फार महत्वाची आहे. भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील (Tenth Schedule) परिच्छेद 2(1)(ब) (Paragraph 2(1)(b)) हा पक्षाचा आदेश (व्हिप) डावलल्यास आमदारांना किंवा खासदारांना अपात्र ठरवण्याबाबतची तरतूद स्पष्ट करतो.
तरतुदीचा सारांश
* मुख्य उल्लंघन: पक्षाच्या अधिकृत आदेशाविरुद्ध (व्हिप) जाऊन सभागृहात मतदान करणे किंवा जाणीवपूर्वक मतदानापासून दूर राहणे.
संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने, आपल्या पक्षाने (किंवा पक्षाने अधिकृत केलेल्या व्यक्तीने) दिलेल्या आदेशाविरुद्ध (Whip) सभागृहात मतदान केले किंवा मतदानास गैरहजर राहिला, आणि त्यासाठी त्याने पक्षाची पूर्वपरवानगी घेतली नसेल, तर तो सदस्य अपात्र ठरतो.
