AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon DCC Bank Election: जळगावमध्ये राजकारण तापलं! उन्मेष पाटील निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकले; नेमकं काय घडलं?

चाळीसगाव सोसायटी मतदार संघामध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण हे महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातील दोन बंडखोर उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक होत आहे. त्यामुळे चाळीसगावमध्ये चुरशीची लढत होत आहे.

Jalgaon DCC Bank Election: जळगावमध्ये राजकारण तापलं! उन्मेष पाटील निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकले; नेमकं काय घडलं?
Jalgaon Bank Election
| Updated on: Nov 29, 2026 | 1:43 PM
Share

खेमचंद कुमावत, प्रतिनिधी:  जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक आज पार पडत आहे. जळगाव जिल्हा बँकेत २१ पैकी 12 जागा महायुतीने आधीच बिनविरोध केल्या असून उर्वरित 9 जागांसाठी आज मतदान होत आहे. या नऊ जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात असून मंत्री गिरिश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळपासून मतदान सुरु असतानाच आता चाळीसगाव मतदान केंद्रावर उन्मेष पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे.

उन्मेष पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये वाद

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या चाळीसगाव मतदान केंद्रावर उन्मेष पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे.  मतदान केंद्रात आलेल्या दोन मतदारांकडे ‘अनफिट सर्टिफिकेट’ नसल्याने त्यांच्यासोबत आलेल्या दोन व्यक्तींवर उन्मेष पाटील यांनी हरकत घेतली.यावरुनच हा वाद पेटला. उन्मेष पाटील यांच्या हरकतीवरुन मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव निवळला.

दरम्यान, चाळीसगाव सोसायटी मतदार संघामध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण हे महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातील दोन बंडखोर उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक होत आहे. त्यामुळे चाळीसगावमध्ये चुरशीची लढत होत आहे. अशातच आता उन्मेष पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याने महायुतीमध्ये तणाव चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

रक्षा खडसेंनी बजावला मतदानाचा हक्क! 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अखेर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुक्ताईनगर मतदान केंद्रावर सकाळपासूनच रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. रक्षा खडसे यांच्या प्रोटोकॉलवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदान केंद्रावर काही काळ राजकीय तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, एकूण 29 मतदारांपैकी अखेरचे 4 मतदार मतदानासाठी शिल्लक असताना रक्षा खडसे यांनी मतदान केले.

Follow Us
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल