AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood Alert: नेपाळमध्ये पुन्हा महापुराची धास्ती; नदीचा आवाज वाढताच नागरिकांना अलर्ट

Nepal Flood: नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. त्यामुळे नव्या पुराच्या इशाऱ्यामुळे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

Nepal Flood Alert: नेपाळमध्ये पुन्हा महापुराची धास्ती; नदीचा आवाज वाढताच नागरिकांना अलर्ट
नेपाळ पूरImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 30, 2026 | 9:26 AM
Share

Nepal Flood: नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसतानाच पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. भोटे कोशी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः नदीकाठच्या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भोटे कोशी नदीच्या वाढत्या प्रवाहाचा धोका लक्षात घेता रसुवा, नुवाकोट आणि धादिंग या जिल्ह्यांतील नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्यास सांगण्यात आलं आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

स्थानिक प्रशासनाला नदीच्या प्रवाहाचा आवाज वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला. परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात असून, नव्या घडामोडींची माहिती नागरिकांना तातडीने दिली जाणार आहे. नेपाळच्या नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने (NDRRMA) नदीच्या आसपासच्या भागातील नागरिक तसंच मदत आणि बचाव पथकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आधीच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नागरिकांना अलर्ट

नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचा आवाज

26 ऑगस्ट रोजी भोटे कोशी आणि त्रिशूली नदीच्या खोऱ्यात आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या घटनेनंतर नदीच्या प्रवाहात पुन्हा वाढ होणं हे बचाव आणि मदतकार्यांसाठीही मोठं आव्हान ठरू शकतं. ‘भोटे कोशी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचा आवाज ऐकू येत असल्याची माहिती रसुवा इथल्या जिल्हा प्रशासकीय कार्यालयाला मिळाली आहे. त्यामुळे रसुवा, नुवाकोट आणि धादिंगपर्यंतच्या नदीकिनारी असलेल्या परिसरात सावधगिरी बाळगण्याची विनंती आम्ही करतो. अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट दिले जाईल’, असं नेपाळच्या एनडीआरआरएमएनं (NDRRMA) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय.

परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत पूरग्रस्त भागातून 88 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर 120 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या महापुरानंतर एकूण 2418 व्यक्ती बेपत्ता आहेत किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. तर पूरग्रस्त भागांमध्ये 287 भारतीय नागरिक आणि 128 भारतीय वंशाचे व्यक्ती (PIOs) अद्याप बेपत्ता आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा