AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Landslide: नेपाळनंतर या देशात हाहाकार! लँडस्लाइडमध्ये १६ जणांचा मृत्यू, ५४६ जण बेपत्ता

China Landslide: नेपाळनंतर चीननेही निसर्गाचा प्रकोप अनुभवला आहे. ग्यिरोंग बंदराजवळील भूस्खलनात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ५४६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेत ४९ भारतीय नागरिकही बेपत्ता आहेत.

Landslide: नेपाळनंतर या देशात हाहाकार! लँडस्लाइडमध्ये १६ जणांचा मृत्यू, ५४६ जण बेपत्ता
nepal floodImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 9:27 AM
Share

चीन-नेपाळ सीमेवरील ग्यिरोंग पोर्टवर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भूस्खलनानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यानंतर दक्षिण-पश्चिम चीनच्या शिजांग स्वायत्त प्रदेशाच्या सरकारच्या मते, शनिवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत १६ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर ५४६ जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ४९ भारतीयही समाविष्ट आहेत. सध्या मदत आणि बचाव दल सातत्याने बेपत्ता लोकांच्या शोधात गुंतले आहेत. एकीकडे नेपाळमध्ये मृत्यूचा हाहाकार उडाला असताना आता नेपाळच्या बाजुचा देश असलेल्या चीनमध्ये देखील मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या शिजांग परिसरातील सीमाभागात एक बंदर परिसरात भूस्खलन झाले आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, भूस्खलनानंतर २३ देशांच्या एकूण २६१ परदेशी नागरिकांबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. यामध्ये सर्वाधिक १०४ नागरिक नेपाळचे आहेत. ४९ भारतीयांसह लॅटव्हियाचे ३३, अमेरिकेचे १८ आणि ब्रिटनचे १५ नागरिक यांचा समावेश आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे ६-६ नागरिकही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे ४, मलेशियाचे ३, जर्मनीचे ३ आणि स्पेनचे ३ नागरिकांचाही पत्ता लागलेला नाही. आयर्लंड आणि एस्टोनियाचे २-२, तर फ्रान्स, नेदरलँड्स, न्यूझीलंडसह अनेक इतर देशांचे नागरिकही बेपत्ता लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत.

२३ देशांचे नागरिक लँडस्लाइडमध्ये अडकले

ही माहिती शिजांग प्रदेशाच्या सरकारच्या माहिती कार्यालयाकडून आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परराष्ट्र व्यवहार, सार्वजनिक सुरक्षा, संस्कृती आणि पर्यटन तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागांनी एकत्रितपणे अनेक स्तरांवर तपास आणि माहितीचा एकत्रित केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी संबंधित देशांच्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनाही या परिस्थितीची माहिती दिली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, बंदर आणि आजूबाजूच्या भागात अनेक वेळा शोधमोहीम राबवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सध्या ग्यिरोंग काउंटीमध्ये कोणताही परदेशी पर्यटक अडकलेला नाही. मात्र, मोठ्या संख्येने लोक बेपत्ता असल्याने शोध आणि बचाव अभियान अद्याप सुरू आहे. प्रशासन प्रभावित भागात मदतकार्य तीव्र करण्यासोबतच बेपत्ता लोकांची माहिती जमा करण्यात गुंतले आहे.

नेपाळमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा ६७० च्या वर

यापूर्वी, नेपाळ-चीन सीमेवर हिमनदीमुळे आलेल्या विनाशकारी पुरामुळे सर्व काही पाण्याखाली गेले होते. तिबेटमध्ये हिमनदी फुटल्यानंतर भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे गावे पत्त्यांच्या घराप्रमाणे वाहून गेली. सध्या, या आपत्तीत ६७६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास २,००० लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक