AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra LIVE : परभणीत मोठं काही तरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

| Updated on: Aug 30, 2026 | 9:27 AM
Share

Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदे यांचा आज परभणी मेळावा पार पडणार आहे. त्यांचा आज दुपारच्या सुमारास मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यासहित मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

Maharashtra LIVE : परभणीत मोठं काही तरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
LIVE UPDATE Image Credit source: टीव्ही9 मराठी

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Aug 2026 09:25 AM (IST)

    नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धाक, कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्हीत कैद

    – नाशिकरोड परिसरात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद  झाला आहे.  नाशिकरोडच्या चाडेगाव परिसरातील ही घटना आहे.  अर्धवट बांधकाम असलेल्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर बिबट्याने कुत्र्याचा माग काढला.  बिबट्यापासून वाचण्यासाठी कुत्र्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली मारली उडी.  बिबट्या आणि कुत्र्याची धावपळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

  • 30 Aug 2026 09:10 AM (IST)

    एकनाथ खडसेंच्या 75 वा वाढदिवस शताब्दी सोहळ्याला दिग्गज नेते उपस्थित राहणार

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा 75 वा वाढदिवस शताब्दी सोहळ्याला सर्व पक्षाचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान खडसेंबाबत आलेल्या नेत्यांपैकी काय वक्तव्य करतात याकडे लक्ष लागून आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन जे खडसेंचे कट्टर विरोधक मानले जातात, त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं होतं.खडसेंच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती असल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  • 30 Aug 2026 09:01 AM (IST)

    केंद्र सरकाराच्या बफर स्टॉकच्या कांद्याचा बाजारावर परिणाम

    केंद्र सरकाराच्या बफर स्टॉकच्या कांद्याचा बाजारावर परिणाम होणार आहे. लासलगावहून दिल्ली, मनमाडहून चेन्नईला असा एकूण १,२५३ टन कांदा रवाना झाला आहे. लासलगावनंतर आता येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात पाच दिवसांत ६२५ रुपयांची घसरण झाली आहे. – २४ ऑगस्टला कांद्याचा सरासरी दर ४,२२५ रुपये इतका आहे.  २९ ऑगस्टला कांद्याचा दर घसरून ३,६०० रुपयांवर आला.  दररोजच्या दरघसरणीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली.  कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युवा शेतकऱ्यांचा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. या सभेला मराठवाड्यातील महायुतीचे नेते त्याचबरोबर आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केलेले खासदार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्याला काय गिफ्ट देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. या सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय राजकीय भूकंप करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. या सहित जग, देशासहित राज्यातील सर्व घडामोडी जाणून घ्या

Published On - Aug 30,2026 8:58 AM

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक