AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात एकाच खोलीत चांगल्या घरातील 3 तरुणी, नको त्या अवस्थेत…; पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वच हादरले

नागपुरातून धक्कादायक घटन उघडकीस आली आहे. वैश्या व्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.

नागपुरात एकाच खोलीत चांगल्या घरातील 3 तरुणी, नको त्या अवस्थेत...; पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वच हादरले
nagpur racket Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 8:09 AM
Share

नागपूरच्या यशोधरानगरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका घरात लपून छपून सुरू असलेला देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एकाच खोलीत तीन तरुणी आढळल्या. दिल्ली, मुंबईसहित इतर शहरातील तरुणींना पैशांचं आमिष देऊन वैश्या व्यवसायात ढकलल्याचे तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय प्रवीण शालीकराम बिलसे उर्फ यादवला अटक करण्यात आली आहे. प्रवीणवर वैश्या व्यवसायासाठी घर उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांना संगमनगरमधील एका घरात वैश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. पोलिसांना छापेमारीत घरात वैश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरात तीन तरुणी आढळल्या. आरोपी तरुण हा स्वत: च्या घरात वैश्या व्यवसाय चालवत होता. पोलिसांना घटनास्थळी एकूण 1 लाख 18 हजार 800 रुपये सापडले. पोलिसांनी ही कारवाई 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास केली.

वैश्या व्यवसायाच्या नेटवर्कचा तपास होणार 

यशोधरा पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून या वैश्या व्यवसायाच्या नेटवर्कचा तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी किती जणांचा हात आहे, याचाही तपास केला जाणार आहे.  वैश्या व्यवसायात तरुणींना कोणी ओढलं, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांचा तपासानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

तरुणींचा असायचा हॉटेलात मुक्काम

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतूनही धक्कादायक माहिती समोर आली. मुंबई, दिल्लीतील तरुणींना कमी दिवसांत जास्त पैसे कमावण्याचे आमिष देण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणींना वेगवेगळ्या शहरातून नागपुरात आणण्यात आले होते. आरोपीने या तरुणींना एका हॉटेलमध्ये ठेवलं. आरोपी प्रवीणने तरुणींसोहत काही महिन्यांचा करार केला होता. या करारवरच तरुणींना देह व्यापारासाठी आणण्यात आलं होतं. तरुणींना वैश्या व्यवसायात ढकलून आंबटशौकीन ग्राहकांची सोय केली जात असल्याचे तपासातून समोर आलं आहे.

Follow Us
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...