AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदाराच्या मुलीचं शाही लग्न चर्चेत! मुलीच्या लग्नासाठी मागवल्या तब्बल 5 लाख पाण्याच्या बाटल्या; ट्रॅक्टरच्या लांबच लागल्या रांगा

एका आमदाराच्या पोरीच्या लग्नात पाहुण्यांसाठी पाण्याची अशी काय व्यवस्था करण्यात आली आहे की ट्रॅक्टरच्या लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून लोकही चक्रावले आहेत. मुलीच्या लग्नासाठी तब्बल 5 लाखांहून अधिक पाण्याच्या बाटल्या मागवल्याचा दावा केला जात आहे

आमदाराच्या मुलीचं शाही लग्न चर्चेत! मुलीच्या लग्नासाठी मागवल्या तब्बल 5 लाख पाण्याच्या बाटल्या; ट्रॅक्टरच्या लांबच लागल्या रांगा
| Updated on: Nov 25, 2026 | 7:30 PM
Share

लग्न म्हटलं की पाहुण्यांची सरबराई आली. जेवण,नाश्ता,बसण्याची व्यवस्था आणि पिण्याचं पाणी.. सगळ्याची तयारी करावी लागते. पण एका आमदाराच्या पोरीच्या लग्नात पाहुण्यांसाठी पाण्याची अशी काय व्यवस्था करण्यात आली आहे की ट्रॅक्टरच्या लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून लोकही चक्रावले आहेत. माजी आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल 5 लाखांहून अधिक पाण्याच्या बाटल्या मागवल्याचा दावा केला जात आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाण्यांच्या बाटल्यांचे ट्रॅक्टर पाहून लोक थक्क

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलींमध्ये पाण्याच्या बाटल्यांचे मोठेमोठे बॉक्स आणि गठ्ठे भरून आणले जात असल्याचे दिसत आहे. एक ट्रॅक्टर येतोय़. त्यानंतर दुसरा… अशा पद्धतीने ट्रॅक्टर येतच जात आहेत. ट्रॅक्टरच्या लांबत्या लांब रांगाच लागल्याचे दिसत आहे.

अनंत सिंह यांच्या मुलीचं लग्न 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लग्नासाठी बिहारसह देशाच्या इतर भागांतूनही पाहुणे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहुण्यांची संख्या 4 ते 5 लाखांपर्यंत असू शकते. अशी चर्चा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गर्दीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधीपासूनच करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

लग्नाची तयारीही अगदी शाही थाटात

या लग्नाची चर्चा केवळ पाण्याच्या बाटल्यांमुळेच नाही, तर इतर तयारींमुळेही सुरू आहे. पाहुण्यांसाठी मोठ्या प्रमाणांवर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 150 प्रकारचे पदार्थ तयार करण्यात येणार असून, शेकडो आचारी आणि कामगार या कामांत गुंतले आहेत. लग्नासाठी भव्य मंडप आणि पंगतीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या लग्नाचा आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे घोड्यांची शर्यत. या शर्यतीतील विजेत्याला महिंद्रा थार, दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला बुलेट आणि तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला स्कूटर देण्याची घोषणा करण्यात आली आल्याची माहिती आहे

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!