AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही वनस्पती घराच्या आसपास चुकूनही लावू नका, तर साप घरात आलेच म्हणून समजा, सापांचा हक्काचा निवारा

अशी काही झाडं असतात, ज्यांच्या विशिष्ट नैसर्गिक गुणांमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. अशा झाडाखाली अनेकदा तुम्हाला साप दिसून येतील. त्यामुळे अशी झाडं शक्यतो घराच्या आसपास लावूच नये. किंवा जर असतील तर काळजी घ्यावी.

ही वनस्पती घराच्या आसपास चुकूनही लावू नका, तर साप घरात आलेच म्हणून समजा, सापांचा हक्काचा निवारा
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 7:06 PM
Share

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, काही साप हे विषारी असतात, तर काही साप हे बिनविषारी असतात. माणसांना त्यांच्यापासून कोणताही धोका नसतो. जसं सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार पडतात, तसेच सापांच्या प्रत्येक प्रजातीच्या सवयी आणि वैशिष्ट्य देखील वेगवेगळे असतात, जसं की प्रत्येक प्रजातीच्या सापाची शिकारीची पद्धत आणि सवय देखील वेगवेगळी असते, काही साप हे प्रचंड आक्रमक असतात. ते माणसांवर हल्ला करू शकतात. तर काही साप हे अत्यंत लाजाळू असतात, ते कधीही माणसांवर हल्ला करत नाहीत. अशा सापांपासून फारसा धोका नसतो.

परंतु साप कोणताही असो, त्याला कधीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, जर तुम्हाला तुमच्या परिसरात कुठेही साप आढळला तर त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित जागी सोडतील. परंतु जरी या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी देखील सर्व सापांमध्ये एक गोष्ट समान आढळते, ती म्हणजे अशी काही झाडं असतात, ज्याकडे सर्व प्रकारचे साप आकर्षित होतात. शक्यतो अशी झाडं कधीही घराच्या परिसरात लावली नाही पाहिजेत, आणि समजा जर असतील तर योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.

या झाडांमध्ये काही विशेष नैसर्गिक गुणधर्म असतात, त्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात, असंच एक झाड आहे, ते म्हणजे निशिगंधाचं झाडं, निशिगंधाच्या झाडाला सुवासिक फुलं येतात. परंतु या झाडाखाली अनेकदा साप देखील आढळू येतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या झाडाच्या फुलांवर मधमाशा मोठ्या प्रमाणात असतात. या मधमाशा खाण्यासाठी किंवा या झाडांवरील छोटी-छोटी इतर किटकं खाण्यासाठी या ठिकाणी बेडूक देखील येतात. निशिगंधाची झाडं ही दाट असतात, त्यामुळे इथे लपण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जागा असते, उंदिर, घुशींचा देखील उपद्रव वाढतो. त्यामुळे अशा ठिकाणी सापांना आयती शिकार मिळत असल्यामुळे अनेका या ठिकाणी साप आढळून येतात.

Follow Us
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा