AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात आघाडी पॉलिटिक्स जोरात, 2 वर्षात किती पक्ष भाजप प्रणीत NDA सोबत आले आणि किती काँग्रेसच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडले?

एका बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चा विस्तार, तर दुसरीकडे INDIA आघाडीतील पक्षांची साथ सुटतेय! AIADMK, अकाली दलासह कोणत्या पक्षांनी NDA मध्ये प्रवेश केला? DMK आणि आपची भूमिका काय?

देशात आघाडी पॉलिटिक्स जोरात, 2 वर्षात किती पक्ष भाजप प्रणीत NDA सोबत आले आणि किती काँग्रेसच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडले?
Indian coalition politics 2026Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 6:56 PM
Share

देशाच्या राजकारणात सध्या नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर NDA च्या विस्ताराला वेग आला आहे. गेल्या दोन वर्षांत चार पक्षांनी NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतून दोन प्रमुख पक्षांनी अंतर ठेवलं आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी भाजपची साथ सोडलेला एक मोठा पक्ष पुन्हा NDA मध्ये परतला आहे.

NDA मध्ये चार पक्षांची भर

गेल्या दोन वर्षांत भाजपप्रणीत NDA मध्ये चार पक्ष सहभागी झाले आहेत. यामध्ये तामिळनाडूमधील AIADMK, टीएमसी (मूपनार), पूरची भारत पार्टी आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचा समावेश आहे.

यातील शिरोमणी अकाली दलाच्या पुनरागमनाची विशेष चर्चा होत आहे. भाजप आणि अकाली दल यांची यापूर्वी अनेक वर्षे युती होती. मात्र, 2020 मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अकाली दलाने NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता जवळपास सहा वर्षांनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत.

इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद

एकीकडे NDA चा विस्तार होत असताना दुसरीकडे इंडिया आघाडीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आम आदमी पार्टी आणि द्रमुक या दोन प्रमुख पक्षांनी इंडिया आघाडीपासून अंतर ठेवलं आहे.

जुलै 2025 मध्ये आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. काँग्रेससोबतचे मतभेद आणि आघाडीतील एकजुटीचा अभाव ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगण्यात आलं. तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या भूमिकेमुळेही इंडिया आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

NDA चं संख्याबळ 39 वर

शिरोमणी अकाली दलाच्या पुनरागमनानंतर NDA मधील पक्षांची संख्या 39 झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे केंद्रातील सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मित्रपक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर इंडिया आघाडीतील मतभेद विरोधकांसाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे देशातील आघाड्यांच्या राजकारणात आगामी काळात आणखी कोणते बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!