AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chota Pudhari : मामाच्या मुलीशी लग्न करता येणार नाही? छोटा पुढारी टेन्शनमध्ये, मोठ्या अडचणीत सापडला!

मला वाईट वाटतंय. माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर आख्खं गाव मामाचं आहे. त्यांना हा नियम समजला तर तर ते काय म्हणतील. आमच्यासारख्या मुलांनी काय करायचं, असाम मजेशीर प्रश्न घनश्याम दरोडेने केलाय.

Chota Pudhari : मामाच्या मुलीशी लग्न करता येणार नाही? छोटा पुढारी टेन्शनमध्ये, मोठ्या अडचणीत सापडला!
chota pudhariImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 6:53 PM
Share

Chota Pudhari : काही दिवसांपूर्वीच रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने येणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. रक्ताच्या नात्यात लग्न केल्यास भविष्यात आरोग्यविषय समस्या निर्माण होतात, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. अशा विवाहावर नियंत्रण आणण्यासाठी एखादा कायदा करता येईल का? अशी विचारणाही न्यायालयाने केंद्र सरकारकडे केलीय. या सर्व घडामोडीनंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर तर आता तरुणांना मामाच्या मुलीशी लग्न करता येणार नाही, असे दावे केले जातायत. हाच मुद्दा उपस्थित करत सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या छोट्या पुढीने एक व्हिडीओ शेअर केलाय. मी तर टेन्शनमध्ये आलोय, असं छोट्या पुढारीने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय.

सरकार तरुणांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही राव

छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्याने या व्हिडीओमध्ये मिश्कील भाष्य केलंय. विनोद म्हणून त्याने तरुणांना आता मामाच्या मुलीसोबत लग्न करता येणार नाही, असं म्हटलंय. सोबतच माझं पण मामाचं गाव आहे. मला मामा मुलगी देणार नाही, असंही तो म्हणालाय. विनोदबुद्धीने घनश्यामने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. “सरकार तरुणांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही राव. सरकारने रोजगाराचा प्रश्न सोडवावा. आता सरकारने तर मेन मुद्द्यालाच हात घातला आहे. सरकारला समजायला पाहिजे ना. तरुणांनीच सरकारला निवडून दिलंय. मला खूप वाईट वाटतंय.आता काय नियम आणलाय की मामाच्या मुलीसोबत लग्न करता येणार नाही. म्हणजे आता मामीला गोड-गोड बोललेलं गेलं. आमच्या आईने मामावरती प्रेम करायला शिकवलं होतं. ते पण असंच गेलं,” असं मिश्कील विधान छोटा पुढारी करताना दिसतेय.

तरुणांनी करायचं काय?

तसेच, आता तरुण पोरांनी काय करायचं. मामा हा शेवटची आशा असते. मामा भाच्याचं भलं करत असतो. पण आता मामाची मुलगी मिळणार नाही. तरुणांनी करायचं काय? सरकारला तुमचं मत भविष्यात कमी करायचंय का? राज्यात अनेक प्रश्न आहेत, असं हसत हसत छोटा पुढारी म्हणाल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय.

शेवटचा पर्याय म्हणजे मामा असतो

मला वाईट वाटतंय. माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर आख्खं गाव मामाचं आहे. त्यांना हा नियम समजला तर तर ते काय म्हणतील. आमच्यासारख्या मुलांनी काय करायचं. शेवटचा पर्याय म्हणजे मामा असतो. परंतु आता मामाच्या मुलीसोबत लग्न करण्यास बंदी असेल तर तरुण पोरांचं अवघड आहे. तरुण पोरांचं आता काही खरं नाही. मला टेन्शन येतंय. मी सभा घेतो. माझ्या सभेला येणाऱ्या तरुणांना मी काय शब्द देऊ. तरुणांनो आता जी गाडी भेटेल तिच्यात बसा. नाहीतर अवघड होईल. आणखी काय काय पाहायला मिळणार आहे, असंही छोटा पुढारीने या व्हिडिओमध्ये म्हटलंय. दरम्यान, त्याच्या या व्हिडीओवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!