AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे दोन गुण माणसाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतात, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात असे काही गुण असतात, जे माणसाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti : हे दोन गुण माणसाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतात, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 6:52 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील काल सुसंगत वाटतात. राजा धनानंद याने चाणक्य यांचा अपमान केला होता, त्यानंतर चाणक्य यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं, अशी आख्यायिका आहे. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात कोणालाही यश असं सहज मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतात. नुसतं कष्ट करूनच चालत नाही तर त्याला नशीबाची देखील साथ हवी असते. मात्र हे जरी खरं असलं तरी देखील असे काही गुण आहेत, जे तुम्हाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतील. हे गुण जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर अशा व्यक्तीला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे हे गुण प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करायलाच हवे, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे नेमके कोणते गुण आहेत, आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलंय?

स्वंयशिस्त – चाणक्य म्हणतात हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा गुण आहे, जो प्रत्येक व्यक्तीकडे असायलाच हवा. जर तुमच्याकडे स्वंयशिस्त नावाची गोष्ट असेल तर तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. थोडक्यात काय तर स्वंयशिस्त म्हणजेच तुमचं स्वत:वर नियंत्रण असणं, ज्या व्यक्तीचं स्वत:वर नियंत्रण आहे, असा व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. त्यामुळे स्वंयशिस्त महत्त्वाची, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्थिक बचत – चाणक्य म्हणतात अनेकांना पैसा खर्च करण्याची सवय असते, परंतु जे व्यक्ती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात, बचत करत नाहीत, असे लोक भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकतात, त्यामुळे बचत ही महत्त्वाची असते. जो व्यक्ती संकट काळासाठी पैशांची बचत करतो, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!