मोठी बातमी! आता थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात सीजेपीचा हल्लाबोल, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा
आज नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य असलेले सौरव दास यांना लंडनला जात असताना विमानतळावर अडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापक अभिजीत दिपके यांनी आधीच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आजा नागपुरात कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेला अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका यांची उपस्थिती होती. उद्या आम्ही नागपुरात संविधान वाचवा रॅली काढणार आहोत, अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये अभिजीत दिपके यांनी दिली आहे. या रॅलीमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज देखील सहभागी होणार आहेत.
दरम्यान नागपूर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. आता भाजपच्या बालेकिल्ल्यातच गुरुवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संविधान वाचवा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये अभिनेते प्रकाश राज देखील सहभागी होणार आहेत. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या रॅलीकडे लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमंक काय म्हणाले दिपके?
उद्या आम्ही नागपुरात संविधान वाचवा रॅली काढणार आहोत, या रॅलीमध्ये प्रकाश राज आणि आशुतोष रांका देखील सहभागी होणार आहेत. सगळ्या राज्यात व्होट चोरी होत आहे, गोकुळ निवडणूक हरल्यावर पण तिथे जिंकण्याचा प्रयत्न केला. दूध डेअरीची निवडणूक जिंकण्यासाठी देखील चोरी केली, इतर निवडणुकीत काय करत असतील ते विचारायलाच नको. नाशिकमध्ये पण एक प्रकरण समोर येत आहे, भाजपच जर कोण जिंकणार कोण लढणार हे ठरविणार असेल तर निवडणुका घेताच कशाला? असा सवाल यावेळी दिपके यांनी उपस्थित केला आहे.
भाजप मुख्यालयात सगळे निर्णय होतात, तिथून ज्ञानेश कुमार यांना एक यादी पाठवली जाते, ते पपेट सारखी यादी वाचून दाखवतात. देश चालवायचा असेल तर उत्तर द्यावी लागतील. देशात मनमानी करता येणार नाही, असंही यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.
