AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Kapoor :अर्जुन कपूर पुन्हा पडला प्रेमात? ‘त्या’ फोटोनं अभिनेत्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री साहिबा बाली यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गुरूपर्वाच्या निमित्ताने साहिबाने अर्जुनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोनंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Arjun Kapoor :अर्जुन कपूर पुन्हा पडला प्रेमात? 'त्या' फोटोनं अभिनेत्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण
| Updated on: Nov 25, 2026 | 6:57 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री साहिबा बाली यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गुरूपर्वाच्या निमित्ताने साहिबाने अर्जुनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोनंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

साहिबा बालीने गुरूपर्वांच्या दिवशी गुरूव्दारातून अर्जून कपूरसोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. या फोटोत दोघेही एकत्र उभे राहून फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे , या फोटोंमध्ये या पोस्टमध्ये साहिबाने अर्जुनला टॅग केले आहे.

या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, ‘मी त्याला दिलेला प्रसादही अर्धा खाल्ला. हॅपी गुरूपर्व. ” साहिबाच्या या मजेशीर कॅप्शनमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले. काही चाहत्यांनी हा फोटो दोघांच्या नात्याची हळूहळू माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच सॉफ्ट लाँच असल्याचा अंदाज व्यक्त केल.

याआधीही दोघे एकत्र दिसले होते

अर्जुन आणि साहिबा यांच्या नात्याबद्दल चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 19 जुलै रोजी लंडनमधील लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी हे दोघे एकत्र गेले होते. त्यावेळी समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये ते स्टँडमध्ये शेजारी बसून सामना पाहताना दिसले होते.

अर्जुनच्या वाढदिवशीही साहिबाने त्याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यासोबत तिने सगळ्यांच्या बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ आता आणखी वजन कमी करू नकोस, केक खा असे लिहिले होते. यावर अर्जुनने तु माझ्या सोबत सहभागी होण्याची वाट पाहतोय, ‘ असे उत्तर दिले होते. त्यांच्या या संवादानंतरही त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

साहिबाने आधी दिले होते स्पष्टिकरण

लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवरील दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर साहिबाने डेटिंगच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. अर्जुनसोबतचा फोटो शेअर करत तिने, ‘ प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका, ‘ असे म्हटले होते.

कोण आहे साहिबा बाली?

साहिबा बाली ही अभिनेत्री, टीव्ही प्रेझेंटर आणि डिजिटल कंटेट क्रिएटर आहे. तिने चित्रपट, वेब सीरिज आणि क्रिडाविषयक डिजीटल कंटेटमध्ये काम केले आहे. लैला – मजनू, बार्ड ऑफ ब्लड, तनाव आणि अमर सिंह, चमकिला हे तिचे अभिनयाचे प्रोजेक्ट्स आहेत.

मात्र अर्जुन कपूर आणि साहिबा बाली यांनी यांच्य़ा नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा केवळ अंदाजावर आधारित आहेत.

Follow Us
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!