AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत…; काँग्रेसच्या खेळीनंतर बडा नेता ॲक्शन मोडमध्ये, बारामतीत काय घडतंय?

बारामती लोकसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत विनंती करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सांगितले.

आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत...; काँग्रेसच्या खेळीनंतर बडा नेता ॲक्शन मोडमध्ये, बारामतीत काय घडतंय?
ajit pawar sunetra pawar
| Updated on: Apr 06, 2026 | 11:06 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आज या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका सत्ताधारी गटाने घेतली आहे. मात्र काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे नेते आजही प्रयत्नशील असून, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही विनंती करणार, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

छगन भुजबळ यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी बारामती पोटनिवडणुकीबद्दल भाष्य केले. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी विविध राजकीय नेत्यांशी संपर्क साधला. आम्ही रामदास आठवले, महादेव जानकर आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तसेच सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांनाही फोन केला होता. त्यावेळी सुनेत्रा पवारांनी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील भेटायला येतील, असे त्यांनी सांगितले होते. त्यावर ठाकरेंनी भेटण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

शरद पवारांसोबतही चर्चा

या प्रक्रियेत राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशीही बोलण्याचे प्रयत्न झाले. छगन भुजबळ यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, तर जयराम रमेश यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली. स्वतः वळसे पाटील आणि मी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आम्ही उमेदवार देणार नाही, हे आधीच जाहीर केले होते, असे सांगितले, असे छगन भुजबळ म्हणाले.

लवकरच काँग्रेससोबत चर्चा करु

अजित पवार आज आपल्यासोबत नाहीत, अशा कठीण परिस्थितीत ही निवडणूक लढवावी लागत आहे. मात्र, राजकीय कटुता टाळण्यासाठी हमरीतुमरीची गरज नाही. प्रत्येकाचे पक्ष वेगळे असले तरी लोकशाहीत विनंती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सुप्रिया ताई, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिका मांडल्या असल्या तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू,” असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांचीही समजूत काढण्यात आली आहे. तसेच लवकरच काँग्रेससोबत चर्चा करु. त्यानंतर यातून मार्ग काढू, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने