छोटा पुढारीही प्रचारासाठी मैदानात, माणिकराव कोकाटेंच्या व्यासपीठावर तुफान फटकेबाजी

नाशिक : महाराष्ट्राला छोटा पुढारी म्हणून परिचित असलेला घनश्याम दरोडे आता निवडणुकीच्या प्रचारातही पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या सभेला हजेरी लावून घनश्यामने तुफान फटकेबाजी केली. तुमचा खासदार कसा असावा हे डोळे उघडे ठेवून पाहा आणि माणिकराव कोकाटेंना निवडून द्या, असं आवाहनही घनश्यामने केलं. शिवाय आपण कुणावरही टीका करणार नसून मला स्वतःलाच …

ghanshyam darode speech, छोटा पुढारीही प्रचारासाठी मैदानात, माणिकराव कोकाटेंच्या व्यासपीठावर तुफान फटकेबाजी

नाशिक : महाराष्ट्राला छोटा पुढारी म्हणून परिचित असलेला घनश्याम दरोडे आता निवडणुकीच्या प्रचारातही पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या सभेला हजेरी लावून घनश्यामने तुफान फटकेबाजी केली. तुमचा खासदार कसा असावा हे डोळे उघडे ठेवून पाहा आणि माणिकराव कोकाटेंना निवडून द्या, असं आवाहनही घनश्यामने केलं. शिवाय आपण कुणावरही टीका करणार नसून मला स्वतःलाच अजून मतदानाचा अधिकार नाही, असं तो म्हणाला.

VIDEO : घनश्याम दरोडेचं संपूर्ण भाषण

नाशिकमध्ये सभा घेऊन माणिकराव कोकाटे यांनी प्रचाराची सुरुवात केली. बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडून हेमंत गोडसे लढत आहेत, तर राष्ट्रवादीकडून या जागेवर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे उमेदवार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात ही जागा मॅनेज असल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंनी केला.

छोटा पुढारी त्याच्या भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या व्यासपीठावर तो फटकेबाजी करतो, तर कधी अपक्ष उमेदवारासाठी तो भाषण करतो. या निवडणुकीत त्याने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत जोरदार फटकेबाजी केली. पण आपण कोणत्याही उमेदवारावर आणि पक्षावर टीका करणार नसल्याचं तो म्हणाला.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात नाशिक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *