AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली, त्यावेळी ते… देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा..

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे राज्याच्या नजरा आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता कस लावली जात आहे. सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली, त्यावेळी ते... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा..
Devendra Fadnavis
| Updated on: Apr 09, 2026 | 1:45 PM
Share

बारामती पोटविधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता महायुतीकडून प्रयत्न केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील मोठ्या नेत्यांनी फोन केला. प्रफुल्ल पटेल यांनी नुकताच ही पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची विनंती केली. काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला. राज्यातील अनेक नेते ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न करत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही सकाळीच हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याकरिता विनंती केली. सगळीकडून प्रयत्न केली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधील गहिनीनाथ गडाच्या सप्ताहासाठी उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी माध्यमांसोबत बोलताना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोटनिवडणुक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मी फोनवर चर्चा देखील केली. ज्यावेळी मी त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यावेळी मला ते सकारात्मक वाटले. पण त्यांचा निर्णय माहिती नाही. मी एक भक्त म्हणून गडावर आल्याचेही त्यांनी म्हटले.

बारातमी पोटविधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा केल्याचे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे त्यांनी म्हटले की, आर.आर आबांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यांनी आपल्याला विनंती केली होती. आता आम्ही पण चर्चा केली पण काय निर्णय होतो माहिती नाही.

गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचा शेवटच्या फोटोवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, माझं मन खूप जास्त भरून आले. कारण ज्या शेवटच्या कार्यक्रमात मी आणि मुंडे साहेब होतो, त्या कार्यक्रमाचा फोटो मिळाला. शेवटी आमच्या जीवनामध्ये मुंडे साहेबांचे वेगळे स्थान आहे. आमच्या सर्व वाटचालीमध्ये त्यांचा एक मोठा वाटा आहे. त्यांच्याकडून विधानसभेत काम कसे करावे, हे शिकलो हे सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या करताना देवेंद्र फडणवीस दिसले.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम