AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दिवाळीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, शिंदे, अजितदादांचं टेन्शन वाढलं

महायुतीमधील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीमध्ये लढणार की स्वबळावर याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ऐन दिवाळीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, शिंदे, अजितदादांचं टेन्शन वाढलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2025 | 3:30 PM
Share

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आणि सुरू असलेला मराठा -ओबीसी वाद पहाता या निवडणुकांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की? घटक पक्ष स्वबळाचा नारा देणार याबाबत अद्याप सर्वच अस्पष्ट आहे. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एमएमआर रिजनमध्ये काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार तर काही ठिकाणी युतीत लढणार असं देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत, दरम्यान फडणवीस यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीचा फॉर्म्यूला ठरला  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे -जिथे विरोधकांना फायदा आहे, तिथे -तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढवल्या जाणार आहेत, असं फडणवीस यांनी बुधवारीच स्पष्ट केलं होतं. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप निवडणूक स्वबळावर लढणार आहे, ठाण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र समोर येत असलेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीत युती झाल्यास त्यातील काही जागा या भाजपला देखील द्यावा लागतील, त्याचा मोठा फटका हा शिंदेंना बसू शकतो, ज्यांना तिकीट मिळालं नाही, ते पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडे वळू शकतात, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ठाण्यात युतीसंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती होणार आहे, तर काही ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढवल्या जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...