Eknath Shinde : हा तर उठाव, शहीद झालो तरी चालेल पण मागे हटायचे नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडाचे कारण

| Updated on: Jul 04, 2022 | 4:49 PM

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलेलं आहे. मी या प्रसंगी खास करुन गेले 15-20 दिवस जे शिवसेनेचे 40 आमदार आणि सहयोगी पक्षाचे 11 आमदार माझ्यावर विश्वास ठेऊन एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.

Eknath Shinde : हा तर उठाव, शहीद झालो तरी चालेल पण मागे हटायचे नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडाचे कारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडाचे कारण
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी बंडाचे कारण उलगडून सांगितले आहे. मी मतदानादिवशी डिस्टर्ब होतो. मतदानादिवशी मला नीट वागणूक मिळाली नाही. कशी वागणूक दिली ते यांनी पाहिलं आहे. मविआत मला वाईट वागणूक मिळाली. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीवेळीही वाईट वागणूक (Behaviour) मिळाली. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायाविरुद्ध बंड असेल, काही असेल केलं पाहिजे. माझ्या मनात आलं आणि माझे फोन सुरु झाले. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे मला फोन होते. कुठे चाललात, म्हटलं मला माहिती नाही. एकाही आमदाराने म्हटलं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊया, हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. यात सुनिल प्रभुंना माहिती आहे, कसे माझे खच्चीकरण सुरू केले होते. मग मी ठरवलं लढून शहीद (Shahid) झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही. मी आमदारांना सांगितलं होतं काळजी करू नका, मी तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेईन असे मी सांगितलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आज आपण ऐतिहासिक घटना पाहतोय

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलेलं आहे. मी या प्रसंगी खास करुन गेले 15-20 दिवस जे शिवसेनेचे 40 आमदार आणि सहयोगी पक्षाचे 11 आमदार माझ्यावर विश्वास ठेऊन एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय हा विश्वास बसत नाही. कारण आतापर्यंतच्या घटना पाहिल्या तर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक यांची विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याची वाटचाल असते. मात्र आज आपण ऐतिहासिक घटना पाहतोय. मला फडणवीस म्हणाले, फक्त देश नाही तर 33 देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सत्तेतून, मी नगरविकास मंत्री होतो. अनेक मंत्री याठिकाणी आहेत. हे सर्व मंत्रीपद डावावर लावून 40 आमदार आणखी 10 आमदार 50 आमदार, एकीकडे बलाढ्य असं सरकार, सरकारममध्ये बसलेली मोठी माणसं एकीकडे आणि दुसरीकडे बाळासाहेबांचे शिवसैनिक.

शिंदे यांच्या घरावर दगड मारायची हिंमत कुणात नाही

मला अभिमान आहे आमच्या 50 लोकांचा. आम्ही मिशन सुरू केलं तेव्हा कुठे चाललोय, किती दिवस लागतील कुणी विचारलं नाही. मी काय छोटीमोठी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही जात नाही. हे का झालं याचा अभ्यास करायला हवा होता. एकिकडे चर्चा करायचे दुसरीकडे काढून टाकायचे. माझ्या घरावर दगड मारायचे आदेश दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारायची हिंमत कुणात नाही. जितेंद आव्हाडांना माहिती आहे माझ्या मागे किती लोक आहेत, ते डसून टाकतीलस असे शिंदे म्हणाले. (Chief minister Eknath Shinde clarification about rebellion from Shivsena)