AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर ; सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ

पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी आरोपींना तातडीने वाहनातून नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विषारी दारूकांडानंतर फुगेवाडीत अजूनही संतापाची लाट कायम आहे.

पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर ; सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ
pune hooch tragedy
| Updated on: Jun 01, 2026 | 10:24 PM
Share

पुणे येथील पिंपरी-चिंचवड फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे १८ हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणात २२ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आज या प्रकरणातील आरोंपींना सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणले तेव्हा संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी वेळी घटना नियंत्रणात आणल्या पुढील गोंधळ टळला.

पुणे येथील फुगेवाडी विषारी दारुकांडात १८ हून अधिक लोकांचा मृ्त्यू झाला आहे. या विषारी दारु वितरण करणारा मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह राधेश्याम प्रजापती, कर्नल मिरका सिंग आणि गुरु मंगल सिंग या चार आरोपींना पिंपरी न्यायालयाने ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींना तपासासाठी आज घटना स्थळी फुगेवाडीत आणण्यात आले होते. या वेळी आरोपींना पासून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.

फुगेवाडी विषारी दारूकांड प्रकरणातील आरोपींना तपासासाठी घटनास्थळी आणल्यानंतर फुगेवाडीतील स्थानिक आणि पीडीत मृतांचे नातेवाईक संतप्त झाले होते. सीआयडीच्या पथकाने पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना येथे गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला. यानंतर तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेत असताना संतप्त नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.

सुरक्षा कवच निर्माण करत जमावाला रोखले

यावेळी काही नागरिकांनी आरोपींच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. एका जेष्ठ महिलेनेही आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडताच सीआयडी पथकाने आणि पोलिसांनी तातडीने वेळीच हस्तक्षेप केला. पोलिसांच्या पथकाने लागलीच आरोपींभोवती सुरक्षा कवच निर्माण करत जमावाला रोखले. काही तरुणांनी दगड उचलून मारण्याचा देखील प्रयत्न केला. वाढता रोष लक्षात घेऊन आरोपींना तातडीने वाहनातून रवाना करण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विषारी दारूकांडानंतर फुगेवाडीत संतापाची लाट कायम आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात