CJP Delhi Protest Live : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर
कॉक्रोच जनता पार्टीने काल दिल्लीत आंदोलन जाहीर केलं होतं. परंतु पोलिसांनी आंदोलनाआधीच आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतरही आज रविवारी सीजेपीने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
सुरक्षा यंत्रणांकडून रस्त्यावर बसेस आडव्या लावून मार्ग अडवले
दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. राजधानीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून रस्त्यावर बसेस आडव्या लावून मार्ग अडवण्यात आले आहेत. तसेच, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठिकठिकाणी चेतावणीचे फलक लावण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. जंतर-मंतर परिसरासह दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
-
दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवली. शिवाजी पार्क परिसरातील दुचाकी हटवण्याच्या वाहतूक पोलिसांनी सूचना दिल्या. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये सुरक्षा वाढवली. वाहतूक विभागाकडून पार्किंगमधील दुचाकी हटवण्याचे नागरिकांना निर्देश दिले
-
-
दिल्लीत आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त
दिल्लीत पोलिसांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते. आजही सीजेपीने आंदोलनाची हाक दिल्याने यंत्रणा अलर्ट आहेत. जंतरमंतरसह दिल्लीतील काही भागात तगडा फौजफाटा आहे. अनेक परिसरात पोलिसांचा वेढा आहे.
-
अभिजीत दिपके- आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार
दिल्ली पोलीस थोड्याच वेळात सीजेपीचे नेते अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली कँट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार आहेत.
-
CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना कोर्टात हजर करणार
अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर प्रतिबंधतामक कारवाई करत अटक करण्यात आली आहे. त्यांना थोड्याच वेळात कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तर पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतात.
-
-
दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सुरक्षा यंत्रणा सतर्क
दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. राजधानीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून रस्त्यावर बसेस आडव्या लावून मार्ग अडवण्यात आले आहेत. तसेच, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठिकठिकाणी चेतावणीचे फलक लावण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी ठेवण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरासह दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
-
दिल्लीत आज मेट्रो सेवा सुरू , प्रवाशांची येजा सुरू
दिल्लीत आज मेट्रो सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. रात्रीपर्यंत सर्व मेट्रो सेवा पूर्ववत केली आहे. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मेट्रो सेवा बंद केली होती. आज मात्र सर्व स्थानक सुरू असून प्रवाशांची ये जा सुरू आहे.
-
-
CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी पार्कात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आज देखील पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात बंदोबस्त पाहायला मिळत आहे. ज्ञानेश कुमार विरोधात सीजीपीच दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पार्कतील दुचाकी काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. अति बंदोबस्त असल्याकारणाने वाहतूक विभागाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनामुळे राजकारण तापलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आज पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सीजेपीच्या अंजिक्य शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विविध परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तर इंडिया आघाडीनेही सोमवारी आंदोलन जाहीर केलं आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध भागातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
Published On - Oct 11,2026 8:28 AM
