Abhijeet Dipke: ‘माझ्यासाठी लूकआऊट नोटीस, मला आत टाकले तर…’, अभिजीत दिपकेंचे मोठे विधान

एकदा अटक केली, दोनदा केली तिसऱ्यांदा अटक करणार, जेलची भीती दाखवू नका. याचीच भीती दाखवून तुम्ही देशाची वाट लावली आहे बारा वर्षात. दोन वर्षात जनता काय असते ते तुम्हाला दाखवेल," असा घणाघात अभिजीत दिपकेंनी केला.

Abhijeet Dipke: माझ्यासाठी लूकआऊट नोटीस, मला आत टाकले तर..., अभिजीत दिपकेंचे मोठे विधान
CJP News
| Updated on: Nov 26, 2026 | 8:49 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी:  कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने आज संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर २०२६) नागपुरातील संविधान चौक येथे ‘लोकशाही बचाव, संविधान बचाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बोलताना सीजेपी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  आंदोलनाला जेवढा विरोध करायचा तेवढा करा, मात्र आम्ही मागे हटणार नाही. आता हा आवाज बंद होणार नाही, असे म्हणत अभिजीत दिपकेंनी थेट सरकारला चॅलेंज दिले.

काय म्हणाले अभिजीत दिपके?

Loading...

‘आपल्या देशाच्या संविधानासाठी आज आपण जमलो आहे दिल्लीचेही तख्त राखतो आपला महाराष्ट्र,जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा सह्याद्री धावून येतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद आहे की एक चहावाला प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर बसतो नाहीतर ते चहाच्या खुर्चीवर बसले असते. श्रीमंत असेल की गरीब, मुस्लिम असेल की त्यांनी कुठल्याही जातीचा धर्माचा, शिक्षित अशिक्षित मात्र संविधानाच्या समोर सर्व एकच आहेत,’ असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

“आम्ही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला. 10 ऑक्टोबरला दिल्लीत जाण्याची घोषणा केल्यावर सुरक्षा यंत्रणांना दिल्लीत बोलावले.  पूर्ण दिल्लीत बॅरिकेट्स लावण्यात आले,नंतर ट्रेन बंद करण्यात आल्या. फक्त कॉकरोजमुळे कोणाला भीती वाटत आहे? मेट्रो,इंटरनेट बंद करण्यात आले, दहा हजारांवर लोकांना डिटेन केले. मात्र ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले 6 निर्णय मागे घ्यावे लागले. जेव्हा हे लोक करतात तेव्हा तो मास्टरस्ट्रोक असतो मात्र चुका मानत नाहीत,” असा टोला यावेळी अभिजीत दिपकेंनी लगावला.

“माझ्यासाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीस काढली आहे, तिथे पोलिसांचा सगळा बंदोबस्त लावला आहे. मी इथे नागपूर आज संविधान चौकात आहे. या इथे.. काय करणार, अटक करणार? एकदा अटक केली, दोनदा केली तिसऱ्यांदा अटक करणार, जेलची भीती दाखवू नका. याचीच भीती दाखवून तुम्ही देशाची वाट लावली आहे बारा वर्षात. दोन वर्षात जनता काय असते ते तुम्हाला दाखवेल,” असा घणाघात अभिजीत दिपकेंनी केला.

मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही…!

तसेच मला, आशुतोष, सौरभला लुकाऊट नोटीस आली आहे. आम्हाला आत टाकले तर तुम्ही शांत बसायचं नाही, तुम्ही लढायचे, लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही लढायचे. बाबासाहेब म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तुम्ही मला संधी दिली आहे त्या संधीला मी सोडणार नाही आम्ही संघर्ष करत राहू. मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असंही यावेळी अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us