कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी! बाळासाहेब ठाकरें सोबत एकनाथ शिंदेचे बॅनर काढले आणि वाद झाला; शेवटी पोलिस आले आणि…

| Updated on: Jul 30, 2022 | 7:51 PM

सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे .त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहने ,भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत .कल्याण डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे .या पार्शवभूमीवर शिवसेने कडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नुकतेच नियुक्त झालेले डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शाखमध्ये भेट देत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी! बाळासाहेब ठाकरें सोबत एकनाथ शिंदेचे बॅनर काढले आणि वाद झाला; शेवटी पोलिस आले आणि...
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात शिवसेना पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. शाखेच्या बाहेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे याचे फोटो एकत्र असलेला जुन्या बॅनर शाखेतून बाहेर का काढला नाही या कारणावरून शिवसैनिक आपआपसात भिडले आहेत. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले आहे. डोंबिवली शहर प्रमुखा सह तिघांवर शाखेत शिरून बॅनर फाडत मारहाण, शिवीगाळ आणि पैसे चोरल्याचा गुन्हा शिवसेना शाखा प्रमुख परेश म्हात्रे यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात दाखल केला आहे. विष्णू नगर पोलिसांनी डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर व त्याच्या सहकारीला अटक करत कल्याण न्यायालयामध्ये दाखल केले असता दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष

सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे .त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहने ,भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत .कल्याण डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे .या पार्शवभूमीवर शिवसेने कडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नुकतेच नियुक्त झालेले डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शाखमध्ये भेट देत आहेत.

शुक्रवारी डोंबिवली पश्चिमेकडील दीन दयाल रोड वरील शिवसेना शाखेत खामकर काही कार्यकर्त्यांसह आले .यावेळी शाखेत शाखा प्रमुख परेश म्हात्रे ,पवन म्हात्रे हे होते.यावेळी खामकर यांही तुम्ही कोणत्या गटात , तुमची भूमिका स्पष्ट करा ,तुम्ही सदस्य नोंदणीचे फॉर्म भरले नाहीत अस सांगत म्हात्रे याच्या सोबत वाद घातला इतकेच नाही तर शाखेत असलेल्या जुन्या बॅनर वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे याचे फोटो एकत्र असलेला बॅनर काढला का नाही असे सांगत गोंधळ सुरू करत शाखेत असलेल्या काही महत्त्वाची कागदपत्र आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले असल्याचा आरोप करत शाखा प्रमुख परेश म्हात्रे यांही विष्णुनगर पोलीस ठाण्यात डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर, विभागप्रमुख शाम चौगुले, विधानसभा संघटक कविता गावंड, आणि शहर संघटक किरण मोडकर या चौघां विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी पोलिसांनी डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर, विभागप्रमुख शाम चौगुले यांना अटक करत कल्याण न्यायालय मध्ये हजर केले असता कल्याण न्यायालयाने यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावेळी कल्याण न्यायालयाच्या बाहेर महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ गावात भर रस्त्यात नारीबाजी केली इतकेच नाहीतर त्या गुन्ह्यात असलेल्या दोन्ही महिलांनी सर्व आरोप खोटे असून हे कार्यकर्तेच शिंदे गटाचे असल्याचे सांगतआम्हाला पण अटक करा असं आव्हान केले. सध्या कल्याण डोंबिवली राजकीय वातावरण तापले असून पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवसेना शाखा तसेच चौकात चौकात पोलीस बंदोबस्त लावला आहे

यावेळी डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर समर्थक कविता गावंड यांनी बोलताना परेश मात्रे हा शाखाप्रमुख त्यांनी स्वतः फोन करून विवेक ला बोलवलं की हे महिलांचं काय सुरू आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे आणि तिथे बोलून आम्हीही तिकडे होतो आणि असंच काय झालं बाकी काही नाही बाचाबाची वगैरे काही झालं नाही नंतर जाऊन त्यांनी पोलीस कम्पलेट केली रात्री बारा वाजता आले याला घ्यायला आणि आमच्यावर पण जर गुन्हा दाखल केला आहे तर आम्हालाही अटक करा ना आमच्यावर दया नकोय शिंदे सरकारची दया बिलकुल नकोय माझ्या बापाने करोडोची प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिसला दिली आहे त्या बाई वरती चोरीचा आल टाकला आहे आम्हाला द्या नको तुमची अटक करा आम्हाला पण आमची नाव आहे ना केलीये ना चोरी शाखेवर आमच्या जाऊन अटक करा तर आम्हालाही अटक करा आम्हाला हा न्याय पाहिजेल आणि आता त्यांना नेत्यांना हा साध्या शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र केला तर त्यालाही आत मध्ये नेलं मनी आहे आम्ही आमचा घाम गाळला यांना निवडून आणायला निषेध आहे.

शिवसेना शाखा हडप करण्याचा प्रयत्न

मी एक शिवसैनिक आहे मला गेल्या 8-10 दिवसापासून महिला येऊन त्याच हडप कराच सुरू होत त्यांचं बोलणंही सुरू होतं की तुम्ही कुठल्या गटात गेले असतील तर आम्हाला शाखा द्या तर आम्ही त्यांना बोलो आम्ही अजून काही केलं नाही तर ते हडपच्या हिशोबाने त्याच चालू होतं काल ते येऊन त्यांच्याबरोबर चर्चा सुरू होती चर्चेत ते बोलले तुम्ही कुठल्या गटात आहे तुम्ही सदस्य नोंदणी केली नाही मग तुमचा निर्णय काय मग आम्ही बोललो आम्ही अजून शिवसैनिक आहे आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीये आणि आम्ही कुठलाच काम करत नाहीये आम्ही शिवसेनेचेच काम करतोय त्याच्यावरून ते झालं सर्व आणि ते मोठ्या मोठ्याने चालू होतं नंतर बाहेर गेले तसे उद्धव साहेबांचा आदित्य साहेबांचा बाळासाहेबांचा शिंदे साहेबांचा खाजदार सायबाचा जुने बॅनर आहे आपण तसंच ठेवलेला आहे ते यांही फाडायला घेतला मी त्यांना विचार ते कश्याला फाडतात तुम्ही आम्ही काढूना पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी ते बॅनर फाडायला घेतले व जोरजोरात शिव्या घालण्यास सुरुवात केली मग त्याच्यानंतर या ठिकाणी लोकांची गर्दी झाली व आमच्या इकडे पिशवी होती त्यात डॉक्युमेंट्स काही पैसे होते पंधरा हजार ते त्यांनी घेऊन गेले.