AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : कर्जमाफी उद्या लागू करण्याबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचेही सांगितले.

Devendra Fadnavis : कर्जमाफी उद्या लागू करण्याबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा
| Updated on: Jul 21, 2026 | 1:09 PM
Share

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल, अशी चर्चा होती. त्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्‍यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्‍यांच्या घोषणने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठं भाष्य केलं. दिवंगत अजितदादांच्या जयंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. या निमित्ताने अतिशय सुंदर असं चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे, ज्यात दादांचं जीवन पाहायला मिळतंय. त्यांची कारकीर्द या निमित्ताने पाहायला मिळतेय. दादांचा उमदा स्वभाव, त्यांच हास्य त्यांची कठोरता हे सगळं यानिमित्ताने पाहायला मिळत आहे’.

नवी दिल्लीतील आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. ‘कुठलंही आंदोलन असलं की, काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात आणि आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीतील आंदोलन हे चेहराहीन होते. त्यामुळे ते भरकटलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या फोडल्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसांनी वेळीच सगळं कंट्रोल केलं नसत तर अनर्थ घडला असता. मी सगळ्या आंदोलनावर आरोप करत नाही. काही लोक चांगल्या भावनेनेही करत असतील, पण काही लोकांना अराजकता माजवण्याचा हेतू असतो’,

सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली. त्यावर त्यांनी म्हटलं की, ते काय बोलले, ते मला माहीत नाही’. आंदोलनावर म्हणाले, ‘काही लोक चांगल्या भावनेने करत असतात. काही लोक स्वार्थ साधत असतात. सगळे एका दिशेने जाणारे नसतात. काही जणांना नीट पण माहीत नाही. हवसे नवसे गवसे असेही काही पक्ष आहेत. ज्यांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे, असेही पक्ष यातून काही साध्य होईल का, ते पाहत असतात’. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आता शक्यता आहे की, उद्याच दादांच्या जयंतीचं औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी बाबासाहेब पाटील तयारी करत आहे’.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...